बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:39 AM2021-04-15T04:39:29+5:302021-04-15T04:39:29+5:30

शेंदुरजना अढ़ाव येथील आपास्वामी महाविद्यालयात जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्राचार्य डॉ. बी. एस. कव्हर, प्रा. डॉ. सुनीता मनवर, ...

Babasaheb Ambedkar Jayanti celebration | बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

Next

शेंदुरजना अढ़ाव येथील आपास्वामी महाविद्यालयात जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्राचार्य डॉ. बी. एस. कव्हर, प्रा. डॉ. सुनीता मनवर, शंकर काळे, अमोल काळे, अनिल राठोड उपस्थित होते.

माधवराव पाटील विद्यालय, कार्ली येथे डॉ. आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक उपेंद्र पाटील, शिक्षक माणिक डेरे, निखिल गावंडे, संतोष गावंडे, रघू भगत उपस्थित होते.

एलएसपीएम विद्यालय धामणी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. प्राचार्य संजय हांडे यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन केले. यावेळी शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते.

वसंतराव नाईक विद्यालय, मानोरा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी शिक्षक अनंत खडसे यांनी प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले. यावेळी मुख्याध्यापक प्रसेन भगत व कर्मचारी उपस्थित होते.

वसंतराव नाईक विद्यालय, वरोली येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी शिक्षक, कर्मचारी यांची उपस्थिती होती.

Web Title: Babasaheb Ambedkar Jayanti celebration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.