पीक कर्जाकरिता शेतकऱ्यांची लगबग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:44 AM2021-04-23T04:44:11+5:302021-04-23T04:44:11+5:30

नवीन कर्ज मिळेल या आशेवर अनेक शेतकऱ्यांनी ३१ मार्चच्या पूर्वीच आपले पीक कर्ज भरले. काहींनी स्वतःजवळचे भरले, तर काहींनी ...

Almost all farmers for crop loans | पीक कर्जाकरिता शेतकऱ्यांची लगबग

पीक कर्जाकरिता शेतकऱ्यांची लगबग

Next

नवीन कर्ज मिळेल या आशेवर अनेक शेतकऱ्यांनी ३१ मार्चच्या पूर्वीच आपले पीक कर्ज भरले. काहींनी स्वतःजवळचे भरले, तर काहींनी उसनवारी करून किंवा काहींनी सावकाराकडून आणून हे पीक कर्ज भरले. त्यानंतर परत ते पीक कर्ज नूतनीकरण केले आहे. बँक पीक कर्ज देत आहे. परंतु, पैसे नसल्याने आणि बँकेचा वेळ कमी केल्याने शेतकऱ्यांनी पीक कर्ज एटीएममधूनच करावे असे सांगितले जात आहे. त्यामुळे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या एटीएमसमोर खूप गर्दी पाहायला मिळत आहे आणि एटीएममधून केवळ २० हजार एका दिवशी घेतले जातात. बँक प्रशासनाने या बाबींची तत्काळ दखल घेऊन शेतकऱ्यांना ताबडतोब पैसे कसे पोहोचतील याकडे लक्ष देण्याची गरज आहे. जेणेकरून एटीएमवर ही गर्दी होणार नाही आणि कोरोना संसर्ग वाढणार नाही.

००००

गेल्या चार दिवसांपासून मी पीक कर्जाचे पैसे घेण्यासाठी जात आहे. परंतु, बँकेत कॅश नसल्याचे कारण सांगून मला ते देत नाहीत आणि एटीएमवर केवळ २० हजार रुपये निघत असल्यामुळे अडचण येत आहे. बँकेने शेतकऱ्यांची गैरसोय दूर करून त्वरित पैसे वाटप करावे.

पप्पू कुटे शेतकरी मालेगाव

००

‘पीक कर्जाचा रोजचा एक कोटी रुपये वाटप आहे. शेतकऱ्यांनी पैसे एटीएममधून काढावे. परंतु, त्याला वीस हजारांची मर्यादा असल्याने शेतकरी बँकेमध्ये पैसे ट्रान्सफर करून एक लाखाच्यावर पैसे काढतात. यामुळे कॅश अपुरी पडते. कॅश नसल्यामुळे ही अडचण जात आहे. जसजसे कॅश मिळेल तसे शेतकऱ्यांना देता येईल.

एस. एल. केंद्रे

शाखाधिकारी मालेगाव

००००

सेंट्रल बँकमधून केवळ १० लाख वाटप

सेंट्रल बँकमधूनसुद्धा पीक कर्ज दिले जाते; मात्र मागील आर्थिक वर्षात शाखाधिकारी यांची बदली झाल्याने वाटप तसाच राहिला. यावर्षीसुद्धा एक एप्रिलपासून वाटप सुरू झाला. परंतु, वीस दिवसांत दहा लाख रुपये वाटप झाले. बँक प्रशासनाने शेतकऱ्यांना होणारी गैरसोय टाळण्याकरिता लवकरात लवकर कर्ज प्रकरण मंजूर, तसेच नूतनीकरण करून शेतकऱ्यांना पीककर्ज देणे अपेक्षित आहे.

००

Web Title: Almost all farmers for crop loans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.