Administrator appoited on washi APMC | वाशिम बाजार समितीवर प्रशासक मंडळ नियुक्त
वाशिम बाजार समितीवर प्रशासक मंडळ नियुक्त

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : महाराष्ट्र शासनाचे कार्यासन अधिकारी जयंत भोईर यांच्या निर्देशावरून स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीवर २३ जुलै रोजी अशासकीय प्रशासक मंडळ नियुक्त करण्यात आले असून, यायोगे गत २२ दिवसांपासून सुरू असलेल्या वादावर पडदा पडला आहे.
वाशिम बाजार समितीमधील विविध स्वरूपातील गैरप्रकारांचे मुद्दे थेट पावसाळी अधिवेशनात गाजले. पणनमंत्र्यांच्या निर्देशावरून १ जुलै रोजी पुर्वीचे प्रशासक मंडळ बरखास्त करून सहायक निबंधक रमेश अंभोरे यांच्याकडे प्रशासक पदाची सूत्र देण्यात आली होती. दरम्यान, २३ जुलै रोजी महाराष्ट्र शासनाचे कार्यासन अधिकारी जयंत भोईर यांनी सहकारी संस्थेच्या जिल्हा उपनिबंधकांकडे पाठविलेल्या पत्रान्वये बाजार समितीवर अशासकीय प्रशासक मंडळ स्थापित करण्याचे निर्देश दिले. त्यात मुख्य प्रशासक म्हणून उकळीपेन येथील संतोष चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच प्रशासक म्हणून विमला इढोळे, शांतीलाल मोदानी, मारोती वाबळे, शिवशंकर भोयर, मदन सावके, सुधाकर बर्वे, रामेश्वर महाले, रेणुका नागरे, नागोराव वाघ, धनाजी सारसकर, रेखा मापारी, कृष्णा महाले, गजानन जाधव, गोविंद चरखा, कैलास गोरे, रवि राऊत, दिलीप काष्टे यांचा समावेश करण्यात आला आहे.

Web Title: Administrator appoited on washi APMC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.