लोकमत वृत्ताची दखल : ५७ लाखांचे धनादेश झाले ‘क्लिअर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 01:49 PM2019-07-15T13:49:00+5:302019-07-15T13:51:47+5:30

स्टेट बँक आॅफ इंडिया (एसबीआय) शाखा रिसोडकडे ‘क्लिअरिंग’साठी पाठविलेले ५७ लाखांचे धनादेश ‘क्लिअर’ झाले आहेत. ‘

57 lakh check cleared in state bank of india risod | लोकमत वृत्ताची दखल : ५७ लाखांचे धनादेश झाले ‘क्लिअर’

लोकमत वृत्ताची दखल : ५७ लाखांचे धनादेश झाले ‘क्लिअर’

googlenewsNext
ठळक मुद्देधनादेश पडून असल्यासंदर्भात ‘लोकमत’ने ११ जुलै रोजी वृत्त प्रकाशित केले होते.याची दखल घेत सर्व धनादेश ‘क्लिअर’ झाले आहेत. 

लोकमत न्यूज नेटवर्क
रिसोड (वाशिम) :  अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा रिसोडतर्फेस्टेट बँक आॅफ इंडिया (एसबीआय) शाखा रिसोडकडे ‘क्लिअरिंग’साठी पाठविलेले ५७ लाखांचे धनादेश ‘क्लिअर’ झाले आहेत. ‘क्लिअरिंग’अभावी धनादेश पडून असल्यासंदर्भात ‘लोकमत’ने ११ जुलै रोजी वृत्त प्रकाशित केले होते.
दि अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून क्लिअरिंगसाठी संबंधित बँकांकडे धनादेश पाठविले जातात. १ जुलै ते ९ जुलैपर्यंतचे ५७ लाखांचे धनादेश स्टेट बँक आॅफ इंडिया शाखा रिसोड येथे पाठविले होते. मात्र, सदर धनादेश निकाली निघाले नव्हते. या प्रकारामुळे शेतकºयांसह ग्राहक त्रस्त झाले आहेत. यासंदर्भात ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करून संबंधित बँक प्रशासनाचे लक्ष वेधले होते. याची दखल घेत सर्व धनादेश ‘क्लिअर’ झाले आहेत. 


दि अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून क्लिअरिंगसाठी पाठविलेले सर्व धनादेश ‘क्लिअर’ झाले आहेत. ग्राहकांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता नेहमीच घेतली जाते.
- बालभद्र भट्ट
शाखा व्यवस्थापक 
स्टेट बँक आॅफ इंडिया शाखा रिसोड

Web Title: 57 lakh check cleared in state bank of india risod

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.