वाशिम जिल्ह्यात आणखी ४४ ‘पॉझिटिव्ह’; २० रुग्णांची कोरोनावर मात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 12:05 PM2021-02-15T12:05:44+5:302021-02-15T12:05:57+5:30

CoronaVirus News ४४ जण कोरोना पाॅझिटिव्ह आल्याने जिल्हावासीयांची चिंता वाढत असल्याचे दिसून येते.

44 more 'positive' in Washim district; 20 patients overcome corona! | वाशिम जिल्ह्यात आणखी ४४ ‘पॉझिटिव्ह’; २० रुग्णांची कोरोनावर मात!

वाशिम जिल्ह्यात आणखी ४४ ‘पॉझिटिव्ह’; २० रुग्णांची कोरोनावर मात!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यात आणखी ४४ जणांचा कोरोना चाचणी अहवाल रविवारी (दि.१४) ‘पॉझिटिव्ह’ आला आहे. यामुळे एकूण बाधितांची संख्या ७,३३४ वर पोहोचली आहे. दरम्यान, रविवारी २० जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.  
जानेवारी महिन्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत चढ-उतार दिसून येत आहे. फेब्रुवारी महिन्यात सुरुवातीला रुग्णसंख्येत चढ-उतार दिसून आले. रविवारी ४४ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आला असून, गत एका महिन्यातील हा उच्चांक मानला जात आहे. यामध्ये वाशिम शहरातील विठ्ठलवाडी जवळील ३, गणेशपेठ येथील १, शुक्रवारपेठ येथील १, नवीन आययुडीपी येथील ३, पाटणी चौक येथील १, मंगरूळपीर शहरातील संभाजीनगर येथील १, बायपास रोड परिसरातील १, बढाईपुरा येथील १,  नवीन सोनखास येथील २, दस्तापूर येथील १, कासोळा येथील १,  नांदखेडा येथील १, गोगरी येथील १, पेडगाव येथील १, शहापूर येथील १, दाभा येथील १, तुळजापूर येथील १, तऱ्हाळा येथील १, रिसोड शहरातील १, मोप येथील २, कवठा येथील १, लोणी येथील १, कारंजा शहरातील संतोषी माता कॉलनी परिसरातील १, बिबसापुरा येथील १, धाबेकर कॉलेज परिसरातील १, शिवाजीनगर येथील १, खडी येथील १, मनभा येथील २, दुधोरा येथील १, धानोरा येथील १, मानोरा तालुक्यातील हत्ती येथील ३, पिंप्री येथील २ व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे निदान झाले आहे. जिल्ह्याबाहेर दोन कोरोनाबाधितांची नोंद झाली असून, २० जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ७,३३४ वर पोहोचला आहे.  दरम्यान, अन्य जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आलेख उंचावत असल्याने आणि वाशिम जिल्ह्यातही ४४ जण कोरोना पाॅझिटिव्ह आल्याने जिल्हावासीयांची चिंता वाढत असल्याचे दिसून येते.
(प्रतिनिधी)

Web Title: 44 more 'positive' in Washim district; 20 patients overcome corona!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.