रिसोड नगर परिषदेला वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी २.४२ कोटीं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:42 AM2021-07-31T04:42:04+5:302021-07-31T04:42:04+5:30

येथील नगर परिषदेला वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान या योजनेअंतर्गत काही रखडलेल्या कामांकरिता २ कोटी ४२ लाख रुपये निधी प्राप्त ...

2.42 crore for special work to Risod Municipal Council | रिसोड नगर परिषदेला वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी २.४२ कोटीं

रिसोड नगर परिषदेला वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी २.४२ कोटीं

Next

येथील नगर परिषदेला वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान या योजनेअंतर्गत काही रखडलेल्या कामांकरिता २ कोटी ४२ लाख रुपये निधी प्राप्त झाला आहे. आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्या विकास निधीमधून हा निधी देण्यात आला आहे.

राज्यातील नगरपरिषदांना वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान देण्यात येते . मागील काही दिवसापासून नगरपरिषदेची काही विकास कामे रखडली होती येथील नगराध्यक्षांसह नगरसेवकांनी वारंवार मागणी व व्यवहार केल्यानंतर आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी आपल्या विकास निधीमधून रिसोड नगर परिषदेला निधी प्राप्त करून दिला आहे. सदर निधी शासननिर्णयातील सर्व अटी व शर्तीच्या अधीन राहून नगरपरिषदेला खर्च करणे बंधनकारक आहे. हा निधी नगरपरिषदेच्या सर्व प्रभागांमध्ये समप्रमाणात खर्च केल्या जाणार आहे . त्यामुळे प्रभागातील नाली बांधकाम कॉंक्रीट रस्ते बांधले जाणार आहेत. हा निधी ३१ मार्च २०२२ पूर्वी खर्च करणे बंधनकारक आहे. हा निधी मिळाल्यामुळे रिसोड नगर परिषदेच्या विकासात भर पडली आहे.

प्रतिक्रिया

आम्ही रिसोड शहराच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध आहोत. आम्ही आमदार बाजोरिया यांच्याकडे शहरातील प्रत्येक वाॅर्डसाठी निधीची मागणी केली व त्यांनी ती मंजूर केली व असाच निधी शहराच्या विकासासाठी मिळावा व रिसोड शहराचा विकास व्हावा, अशी प्रतिक्रिया नगराध्यक्ष विजयमाला असनकर यांनी दिली.

Web Title: 2.42 crore for special work to Risod Municipal Council

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.