When 186 houses of the police were begun? | पोलिसांच्या १८६ घराला मुहूर्त कधी ?
पोलिसांच्या १८६ घराला मुहूर्त कधी ?

नालासोपारा : विरार पश्चिमेकडील यशवंत नगरच्या बाजूला असलेल्या म्हाडा कॉलनीमधील एका २४ मजल्याच्या इमारतीमध्ये म्हाडाने पोलिसांसाठी १८६ घरे राखीव ठेवली आहेत. पण त्यांच्या उद्घाटनाच्या सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना येण्यास वेळ नसल्याने ही घरे पोलिसांच्या हाती सुपूर्त होण्यास मुहूर्त कधी मिळणार? अशी चर्चा नागरिकांसह पोलीसांमध्ये सुरू आहे.
लॉटरी पद्धतीने १८६ पोलिसांना घरे वाटप केली जाणार असून त्यांचे फॉर्म काढण्यात आले आहे. ३१ मे पर्यंत फॉर्म व घरांसाठी ठरविण्यात आलेल्या रकमेचा डीडी भरण्याची शेवटची तारीख होती. ८ जूनला मुख्यमंत्री विरार येथे कार्यक्र माला येणार असल्याची चर्चा असल्याने म्हाडाच्या परिसरात कार्यक्र माची तयारी करण्यात आली होती. पण मुख्यमंत्री कार्यालयातून फडणवीस यांचा अगोदरचा कार्यक्र म जाहीर असल्याने या कार्यक्र मासाठी वेळ न मिळाल्याने ते आलेच नाहीत.

मुख्यमंत्री कार्यालयातून अद्याप पर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वेळ मिळाली नाही. ती मिळाल्यावर घरांची सोडत आणि घरे देण्याची प्रक्रि या होणार आहे.
- विजयकांत सागर
(अप्पर पोलीस अधीक्षक, वसई)


Web Title: When 186 houses of the police were begun?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.