किनाऱ्यावरील डांबरगोळ्यांमुळे जलप्रदूषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2019 11:12 PM2019-12-15T23:12:24+5:302019-12-15T23:12:31+5:30

मत्स्य उत्पादनावर परिणाम : किनाऱ्यांचीही मोठी धूप, तिवरांची जंगले नष्ट होण्याची भीती

Water pollution caused by shoreline shore | किनाऱ्यावरील डांबरगोळ्यांमुळे जलप्रदूषण

किनाऱ्यावरील डांबरगोळ्यांमुळे जलप्रदूषण

Next

हितेन नाईक।
लोकमत न्यूज नेटवर्क
पालघर : प्रदूषणाच्या विळख्याने जिल्हा होरपळू लागला असताना वायू प्रदूषणाने स्थानिकांचे आयुष्यमान घटू लागले आहे. त्यातच आता समुद्रातून मोठ्या प्रमाणात किनाºयावर आलेल्या तेल-तवंगामुळे (डांबरगोळे) जल प्रदूषण वाढत असून मत्स्य संपदेसह किनाºयावरील तिवरांची (कांदळवन) जंगले नष्ट करायला सुरुवात केली आहे.


प्रदूषणात जिल्ह्याने एक नंबर गाठल्यानंतर इथले नदी, नाले, खाडी, खाजणे, शेती-बागायती तारापूर एमआयडीसीमधून सोडल्या जाणाºया प्रदूषित पाण्याने नापीक बनल्या आहेत. त्यातच हरित लवादाने दिलेल्या आदेशानंतर करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार किनारपट्टीवरील अनेक गावांत कॅन्सर, त्वचेचे आजार व श्वसनाच्या आजाराची मोठी संख्या असल्याचे वास्तव समोर आले आहे. त्यामुळे माणसाचे सरासरी आयुष्यमान घटत असताना उपाययोजनेबाबत शासन व प्रशासन संवेदनशील नसल्याचे दिसून आले आहे. तारापूर एमआयडीसी, पालघर बिडको, पिडको औद्योगिक वसाहतीमधूनही निघणाºया प्रदूषणाविरोधात इथले स्थानिक लढत असताना आता समुद्री मार्गाने येणाºया तेल-तवंगांची मात्रा वाढू लागली आहे. पावसाळ्यात काही कालावधीत किनाºयावर दिसणारे डांबरगोळे आता वर्षभर दिसून किनारे विद्रूप करू लागले आहेत. शिरगावच्या किनारपट्टीवर उत्तरेस विस्तारलेल्या तिवरांचे (कांदळवने) क्षेत्र प्लास्टिक कचरा व डांबर गोळ्याच्या आक्रमणाने धोक्यात सापडले आहे. समुद्राच्या पाण्याद्वारे वाहून आलेले क्रूड आॅइल तिवरांच्या पानांवर साचून राहिल्याने ती पाने करपून जात संपूर्ण झाडे सुकून गेली आहेत. त्याचबरोबर या करपून खाली गळलेल्या पानांचा कचरा आणि तेलाच्या डांबरगोळ्यांपासून बनलेले टार बॉल्स किनाºयावर मोठ्या प्रमाणावर आढळून आले आहेत. या भागातील सुमारे अडीच एकर क्षेत्रावरील तिवरांची झाडे नष्ट होत असल्याचे धक्कादायक वास्तव पर्यावरणप्रेमी प्राध्यापक भूषण भोईर यांनी समोर आणले आहे. ही तिवरांची जंगले हळूहळू नष्ट झाल्यास मत्स्यप्रजनन आणि माश्यांच्या अधिवासांची मोठी गंभीर समस्या निर्माण होत त्याचा परिणाम मत्स्य संपदेवर झाला आहे.


ज्या ठिकाणी ही कांदळवने मेलेली आहेत, बरोबर त्याच्यासमोरील बाजूस समुद्रकिनाºयाची धूप सुरू आहे. मोठ्या प्रमाणावर कांदळवने नष्ट झाल्यास त्याचा विपरीत परिणाम ऊसबाव आणि वडराई येथील किनारपट्टीवर होऊ शकतो.
- प्रा. भूषण विलास भोईर,
प्राणीशास्त्र विभाग, सोनोपंत दांडेकर महाविद्यालय, पालघर.

Web Title: Water pollution caused by shoreline shore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.