वाडा-जव्हार बसला झाला भीषण अपघात, दोन दुचाकी बसच्या खाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2020 06:49 AM2020-09-14T06:49:28+5:302020-09-14T06:49:47+5:30

जव्हारहून सात किमी अंतरावर असलेल्या अपघातप्रवण क्षेत्र कासटवाडी येथे वाडाहून जव्हारकडे येणाऱ्या बसचालकाचा ताबा सुटून बस विरुद्ध दिशेने जाऊन समोरून येत असलेल्या दोन दुचाकींना धडक देऊन भीषण अपघात घडला.

Wada-Jawahar bus had a terrible accident, two two-wheelers under the bus | वाडा-जव्हार बसला झाला भीषण अपघात, दोन दुचाकी बसच्या खाली

वाडा-जव्हार बसला झाला भीषण अपघात, दोन दुचाकी बसच्या खाली

Next

जव्हार : वाडा-जव्हार बसला अपघाती क्षेत्र असलेल्या कासटवाडीच्या वळणावर भीषण अपघात होऊन एकाच वेळी दोन दुचाकी बसच्या खाली चिरडल्या गेल्याची घटना रविवारी दुपारी २ च्या दरम्यान घडली आहे. या घटनेत दोन दुचाकीवरील तिघे जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
जव्हारहून सात किमी अंतरावर असलेल्या अपघातप्रवण क्षेत्र कासटवाडी येथे वाडाहून जव्हारकडे येणाऱ्या बसचालकाचा ताबा सुटून बस विरुद्ध दिशेने जाऊन समोरून येत असलेल्या दोन दुचाकींना धडक देऊन भीषण अपघात घडला. यात पहिली दुचाकी बसच्या पुढील चाकाखाली आली. या दुचाकीवरील दोघांना गंभीर मार लागला, तर दुसरी दुचाकी मागील चाकाखाली आली. या दुचाकीस्वारालाही किरकोळ मार लागला असून तिघांनाही सुरुवातीला जव्हारच्या कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले.
योगेश माणिक वावटे (२०), सीताराम विष्णू हंडवा (२५) आणि मोनाली नारायण बार्शी (१८) असे जखमी झालेल्यांची नावे आहेत. यातील गंभीर जखमी झालेल्या दोघांना बोईसर येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या अपघातात दोन्ही दुचाकींचा चक्काचूर झाला आहे.

Web Title: Wada-Jawahar bus had a terrible accident, two two-wheelers under the bus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :palgharपालघर