Vidhan Sabha 2019: पालघर जिल्ह्यातील ६९ उमेदवारांचे अर्ज वैध

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2019 01:52 AM2019-10-06T01:52:58+5:302019-10-06T01:58:57+5:30

बोईसर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीतील एकूण ११ उमेदवारांनी १७ अर्ज भरले होते.

Vidhan Sabha 2019: Application forms for 19 candidates from Palghar district valid | Vidhan Sabha 2019: पालघर जिल्ह्यातील ६९ उमेदवारांचे अर्ज वैध

Vidhan Sabha 2019: पालघर जिल्ह्यातील ६९ उमेदवारांचे अर्ज वैध

Next

पालघर : विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात सहा विधानसभा मतदारसंघातील ८० उमेदवारांपैकी ६९ उमेदवारांचे अर्ज वैध ठरली आहेत. तर ११ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरली आहेत. सोमवारी कोण माघार घेणार याकडे लक्ष लागले असून त्यानंतर जिल्ह्यातील चित्र स्पष्ट होईल.
डहाणूतून भाजपचे पास्कल धनारे, राजेश रावजी दूमाडा, विनोद भिवा निकोले, सुनिल लहान्या ईभाड, मनसेचे अ‍ॅड. प्रवीण नवशा वळवी, भारतीय ट्रायबल पार्टी, विजय काकड्या घोरखाना, शिलानंद बिना काटेला, संतोष किसन पागी, दामोदर शिराड रांधे, रमेश जानू मलावकर, वैदेही विशाल वाढाण, अपक्ष या उमेदवारांचे अर्ज वैध ठरली आहे.
विक्र मगडमधून सुनील भुसारा, सुरेश भाऊ भोईर, संजय रघुनाथ घाटाळ, डॉ. हेमंत विष्णू सवरा, कमा धर्मा टबाले, मोहन बारकू गुहे, सखाराम बाळू भोईर, संतोष रामदास वाघ, दीपक लहु महाकाळ, प्रमोद येदू डोके, भालचंद्र नवसू मोरघा, भास्कर लक्ष्मण बेंडगा, मधुकर धर्मा खुताडे, शिवराम धावजी गिरंधला, सुरेख विठ्ठल तेथले, हरिचंद्र सखाराम भोय यांचे अर्ज वैध ठरले आहे.
पालघरमध्ये उमेश गोपाळ गोवारी, अमित घोडा, योगेश शंकर नम, सुरेश गणेश जाधव, श्रीनिवास वनगा, रोहन भरत वेडगा, विराज रामचंद्र गडग या उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. नालासोपारातून प्रदीप शर्मा, सलमान अब्दुल करीम बलूच, राकेश विश्वनाथ अरोरा, प्रवीण गायकवाड, मोहसिन मोहम्मद शिरफ शेख, हितेश प्रदीप राऊत, क्षितीज ठाकूर, अमर किसन कवळे, ओमकार शेट्टी, परेश घाटाळ, प्रविणा हितेंद्र ठाकूर, अपक्ष, मुझफ्फर जूलकर व्होरा, डॉ. विजया दत्ताराम समेळ, सतीश सीताराम वारेकर, सुशांत मधूकर पवार, हितेंद्र ठाकूर अपक्ष या उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहे.
वसईतून अंतोन व्हिक्टर डिकूना, प्रफूल्ल नारायण ठाकूर, विजय गोविंद पाटील, भावेश चंद्रकात भोईर, शाहीद कमाल शेख, हितेंद्र विष्णू ठाकूर, बहुजन विकास आघाडी, प्रविणा हितेंद्र ठाकूर, अपक्ष, सुनील सिंह, क्षितीज हितेंद्र ठाकूर, अपक्ष या उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत.
वसई विधानसभामध्ये २० पैकी चार जणांचे अर्ज बाद झाले असून १६ अर्ज वैध ठरले आहेत. बाद झालेल्यांमध्ये सुनील सिंग (हिंदू जागरण सभा ), सुशांत पाटील (शिवसेना), शिवाजी सुळे (मनसे), विनोद तांबे ( बसपा ) यांचा समावेश आहे.

बोईसर विधानसभा मतदारसंघातील ११ पैकी १ उमेदवारी अर्ज अवैध
बोईसर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीतील एकूण ११ उमेदवारांनी १७ अर्ज भरले होते. शनिवारी या अर्जांची छाननी करण्यात आली. तेव्हा ११ पैकी एका उमेदवाराचा अर्ज अवैध ठरला असून आता १० उमेदवारांपैकी किती जण अर्ज मागे घेतात त्यावर सर्व निवडणुकीचे समीकरणे अवलंबून आहेत.
अनुसूचित जमातीकरिता आरक्षित असलेल्या बोईसर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अर्ज भरण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत विविध राजकीय पक्ष व अपक्ष मिळून ११ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी बहुजन समाज पक्षाच्या दोन उमेदवारांनी अर्ज भरले होते. त्यापैकी किरण मोरे यांचा अर्ज अवैध ठरविण्यात आला आहे.
आता शिवसेना- भाजप युतीचे विलास तरे, मूळचे भाजपचे परंतु अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेले संतोष जनाठे, बहुजन विकास आघाडीचे राजेश पाटील व विष्णू कडव, दिनकर वाढाण (मनसे), सुनील गुहे (बहुजन समाज पार्टी), राजेसिंग कोळी (वंचित बहुजन आघाडी), श्याम गवारी (भारतीय ट्रायबल पार्टी), रुपेश धांगडा (संघर्ष सेना), सदू आंधेर (अपक्ष) हे १० उमेदवारी अर्ज वैध झाले आहेत.
शुक्र वारी भाजप-सेना युतीची घोषणा करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जर कोणी बंडखोरी केली तर यापुढे त्याला युतीत कोणत्याच पक्षात जागा राहणार नाही. असे सांगितल्यानंतरही भाजपचे जिल्हा सरचिटणीस व अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरलेले संतोष जनाठे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.

Web Title: Vidhan Sabha 2019: Application forms for 19 candidates from Palghar district valid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.