वसईतील भाज्यांचे भाव गगनाला भिडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2019 12:21 AM2019-11-15T00:21:47+5:302019-11-15T00:21:50+5:30

अवकाळी पावसाने वसई तालुक्यामध्ये हजेरी लावल्याने याचा सर्वात मोठा फटका शेतीला बसला आहे.

Vegetable prices in Vasai started to skyrocket | वसईतील भाज्यांचे भाव गगनाला भिडले

वसईतील भाज्यांचे भाव गगनाला भिडले

Next

नालासोपारा : अवकाळी पावसाने वसई तालुक्यामध्ये हजेरी लावल्याने याचा सर्वात मोठा फटका शेतीला बसला आहे. पावसामुळे वसईत बाहेरच्या जिल्ह्यातून येणाऱ्या भाज्यांसह वसई - विरारमध्ये पिकविण्यात येणाºया भाज्यांचे नुकसान झाल्याने भाज्यांच्या किंमतीमध्ये कमालीची वाढ झाली आहे.
नोव्हेंबर उजाडला तरीही पाऊस सुरु असल्याने शेतीचे आणि मच्छीमारांचे यामध्ये सर्वाधिक नुकसान झाले आहे. मात्र, याचा फटका भाज्यांच्या किंमतींना बसला आहे. वसईच्या बाजारात अनेक भाज्यांच्या किमती दुपटीने वाढल्या आहेत. वसई - विरारला टोमॅटो, कोबी, सिमला मिरची, वाटाणा, काकडी या भाज्यांचा पुरवठा नाशिकहून होतो. तर भेंडी, गवार, पालक, मेथी, तांदुळका, शिराळे, शेवग्याच्या शेंगा, दुधी, कारले, वांगी या सर्व भाज्या आगाशी, अर्नाळा, निर्मळ, कळंब, वसई या पश्चिम पट्ट्यात पिकवल्या जातात. मात्र, सर्वत्र पाऊस झाल्याने या भाज्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे वसई - विरारमध्ये या भाज्यांची आवक घटली आहे.
कांदा महाग झाल्याने त्याची जागा सध्या मुळ्याने घेतली आहे. अवकाळी पावसामुळे कांद्याची आवक घटल्याने त्याला सोन्याचा भाव आला आहे. एक किलोला ७० ते ८० रुपये भाव आल्याने हॉटेल व्यावसायिकांनी आपल्या ग्राहकांना पार्सल आणि टेबलावर देण्यात येणारा कांदा बंद केला असून आता त्यासाठी काकडी आणि मुळ्याचा आधार घेतला आहे.
।छोट्या व्यावसायिकांना मोठा फटका....
कांदा, टोमॅटो, मिरची यांच्या भाववाढीने छोटे खाद्यपदार्थ विक्रेते अडचणीत सापडले आहेत. अंडा भुर्जी, कांदा भजी, मिसळ यासारख्या कांदा, टोमॅटो, मिरची प्रमुख घटक असलेल्या खाद्य पदार्थांच्या गाड्यांवर कांद्याच्या भाववाढीने परिणाम झाला आहे. कांदा, टोमॅटो, मिरची परवडत नसल्याने अनेक छोटे धंदेवाल्यांनी आपल्या गाड्या बंद ठेवल्या आहेत.
। भाज्यांचे भाव आधीचे भाव सध्याचे भाव
भेंडी ६० १०० रु. किलो
पालक भाजी १० २० रु. जुडी
मेथी १० २० रु. जुडी
कोबी ५० ८० रु. किलो
काकडी ४० ७० रु. किलो
मिरची ८० १२० रु. किलो
वालाच्या शेंगा १०० १५० रु किलो
वांगी ४० ७० किलो
कोथिंबीर ४० ८० रु. जुडी
कांदा ४० ८० किलो

Web Title: Vegetable prices in Vasai started to skyrocket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.