डहाणूत समुद्रकिनाऱ्यावर ड्रोनचा वापर; प्रशासन अनभिज्ञ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2020 11:54 PM2020-01-15T23:54:38+5:302020-01-15T23:54:50+5:30

सुरक्षेच्या दृष्टीने परवाना तपासण्याची गरज

The use of drones on the shoreline; The administration is ignorant | डहाणूत समुद्रकिनाऱ्यावर ड्रोनचा वापर; प्रशासन अनभिज्ञ

डहाणूत समुद्रकिनाऱ्यावर ड्रोनचा वापर; प्रशासन अनभिज्ञ

Next

अनिरुद्ध पाटील

डहाणू/बोर्डी : ड्रोन कॅमेºयाच्या साहाय्याने छायाचित्र आणि चित्रीकरणाचा एक नवीन ट्रेंड निर्माण झाला आहे. यासाठी तालुक्यातील समुद्रकिनाºयाचा उपयोग होत असून हा परिसर सेल्फी पॉर्इंटप्रमाणेच ड्रोन पॉर्इंट ठरतो आहे. दरम्यान, सीमा भागाच्या सुरक्षेच्यादृष्टीने हे धोकादायक असून विना परवानाधारकांवर कारवाईची गरज व्यक्त होत आहे.

तालुक्याला ३३ किमी लांबीचा समुद्र्रकिनारा लाभला आहे. येथील पारनाका, आगर, नरपड, चिखले, घोलवड आणि बोर्डी आदी चौपाट्या रुपेरी वाळू, समुद्रातील खडकाळ भाग, किनाºयालगतच्या सुरू बागांची हिरवी भिंत या निसर्ग सौंदर्याने नटलेल्या आहेत. त्यामुळेच स्थानिकांप्रमाणेच परगावातील पर्यटकांच्या पसंतीस उतरत आहेत. येथे प्री आणि पोस्ट वेडिंगकरिता ड्रोनद्वारे छायाचित्र आणि चित्रीकरण करण्याचा ट्रेंड वाढतो आहे. वेगवेगळे ग्रुप खुलेआम ड्रोन उडविण्याचे धडेही गिरवताना दिसतात. त्यानंतर हे फोटो आणि व्हिडीओ सोशलमीडियावर पोस्ट केले जातात.

मुंबई दहशतवादी हल्ल्यावेळी पाकिस्तानहून कसाब आणि त्याच्या साथीदारांनी याच समुद्रीमार्गाचा उपयोग केला होता. तर दोन-तीन वर्षांपूर्वी गुजरातच्या समुद्रात तटरक्षक दलाने संशयास्पद बोटीवर कारवाई केली होती. तेव्हापासून हा किनारी भाग सुरक्षेच्यादृष्टीने संवेदनशील समजला जातो. दरम्यान, नियमानुसार प्रत्येक ड्रोनसाठी युनिक आयडेंटिफिकेशन दिला जातो. त्याच्या वापरकर्त्यांना परमिट घेणे बंधनकारक आहे. ३१ जानेवारीपर्यंत हे यंत्र बाळगण्याची नोंद करणे आवश्यक आहे. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव ड्रोन उडविणाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी होत आहे.

डहाणू आणि परिसरात किनारी भागातली महत्त्वाची स्थळे
तारापूर अणू विद्युत केंद्र आणि औद्योगिक वसाहत, डहाणू थर्मल पॉवर स्टेशन, डहाणू गावातील फोर्ट, तटरक्षक दलाचे हावर्डक्राफ्ट स्टेशन, प्रमुख राज्य मार्गावरील डहाणू खाडीसह अनेक खाड्यांवरील पूल, कस्टम, पोलीस, मेरीटाईम, तहसील, सहा. जिल्हाधिकारी कार्यालये आदी.

Web Title: The use of drones on the shoreline; The administration is ignorant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस