Uncertainty among candidates due to increased percentage | वाढलेल्या टक्क्यांमुळे उमेदवारांत अस्वस्थता
वाढलेल्या टक्क्यांमुळे उमेदवारांत अस्वस्थता

हितेन नाईक  

पालघरमध्ये २०१८ साली झालेल्या लोकसभा पोटनिवडणुकीच्या तुलनेत यंदा मतदानाची आकडेवारी १०.५ टक्क्यांनी वाढली आहे. त्यामुळे उमेदवांरांमध्ये अस्वस्थता पसरली आहे, कारण हे वाढलेले मतदानच विजेता ठरविणार आहे. त्यातही वसई, नालासोपारा, बोईसरमधील वाढीव मतांवर विआचे नेते दावा करत आहेत, तर हा वाढीव टक्का आमचाच असल्याचा शिवसेनेचा दावा आहे. ग्रामीण भागात शिवसेनेला भाजपची किती मदत झाली, त्याबद्दल वेगवेगळा अंदाज व्यक्त होत आहे. शिवाय काँग्रेस, राष्ट्रवादी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षांनी ग्रामीण भागात असलेल्या आपल्या प्रभावाबद्दल मतदानापूर्वी वेगवेगळे दावे केले होते. ते प्रत्यक्षात कितपत खरे होते, याचा अंदाज मतदानानंतर लागेल. नालासोपाऱ्यात मतदानापूर्वी झालेल्या राड्याचा परिणामही त्याच वेळी दिसून येईल.

या मतदारसंघातून एकूण १२ उमेदवार रिंगणात होते. मात्र, खरी लढत होती ती सेना-भाजप युतीचे उमेदवार राजेंद्र गावित आणि आघाडी पुरस्कृत बविआचे उमेदवार बळीराम जाधव यांच्यात. यंदा १८ लाख ८५ हजार २९७ मतदारांपैकी १२ लाख १ हजार २९८ मतदारांनी आपला हक्क बजावला. २०१८ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत ५३.२२ टक्के मतदान झाले होते. त्यामुळे वाढलेले १०.५ टक्के मतदान कुणाला फायदेशीर ठरते, यावर उमेदवारांचे भवितव्य अवलंबून आहे.

मे २०१८ च्या पोटनिवडणुकीत एकूण १७ लाख ३१ हजार ७७ एवढे मतदार होते. यावर्षी ही संख्या वाढून एकूण १८ लाख ८५ हजार २९७ मतदारांची नोंद झाली आहे. त्यात ९ लाख ८८ हजार ९९७ पुरु ष, ८ लाख ९६ हजार १८९ महिला, तर १११ तृतीय पंथीय मतदारांचा समावेश आहे. यंदा एकूण मतदारांपैकी १२ लाख १ हजार २९८ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला असून, त्यात ६ लाख ४१ हजार १५६ पुरु ष (६४.८३ टक्के), ५ लाख ६० हजार ११८ महिलाा (६२.५० टक्के), तर २४ तृतीयपंथीय (२१.६२ टक्के) मतदारांचा समावेश आहे.


Web Title: Uncertainty among candidates due to increased percentage
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.