आदिवासींवर आजही अत्याचार! छत्तीसगडच्या राज्यपालांनी मांडले समाजबांधवांचे वास्तव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2020 10:44 PM2020-01-14T22:44:25+5:302020-01-14T22:44:40+5:30

शिक्षणाशिवाय आपली प्रगती होऊ शकत नसल्याचे सांगून आपली होणारी लूट रोखण्यासाठी एकत्र येण्याची गरज व्यक्त केली

Tribal people are tortured even today! The reality of social bonds laid down by the governors of Chhattisgarh | आदिवासींवर आजही अत्याचार! छत्तीसगडच्या राज्यपालांनी मांडले समाजबांधवांचे वास्तव

आदिवासींवर आजही अत्याचार! छत्तीसगडच्या राज्यपालांनी मांडले समाजबांधवांचे वास्तव

Next

पालघर : अनेक राज्यांत विकासाच्या नावाखाली आदिवासींच्या जमिनी शासनाला अथवा खाजगी उद्योगपतींना हस्तांतर करताना त्यांना संविधानाने दिलेल्या अधिकाराने नोकऱ्या व नुकसान भरपाई दिली जात नाही. त्यामुळे आजही आदिवासींवर अन्याय-अत्याचार होत असून या समाजाला आपल्या हक्कांसाठी झगडत राहावे लागत असल्याचे वास्तव छत्तीसगडच्या राज्यपाल अनुसया उईके यांनी पालघरमध्ये आयोजित २७व्या आदिवासी एकता महासंमेलनात मांडले.

पालघर येथे आदिवासी एकता परिषदेच्या वतीने आदिवासी संस्कृती एकता परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनाचे उद्घाटन राज्यपाल उईके यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी अध्यक्ष बबलुभाई निकोडिया, खासदार राजेंद्र गावित, मध्य प्रदेशचे मंत्री ओमकार मरकाम, युनोच्या आदिवासी मंचाचे उपाध्यक्ष फुलमंद चौधरी, एकता परिषदेचे अध्यक्ष काळूराम धोदडे, अशोक चौधरी, वाहरू सोनावणे, आ.श्रीनिवास वणगा, राजेश पाटील, सुनील भुसारा, डॉ.विश्वास वळवी आदी मान्यवर उपस्थित होते.

आदिवासी समाजावर आजही मोठ्या प्रमाणात अत्याचार होत असून त्यांना त्यांच्या जंगलातून, जमिनीतून बेदखल केले जात आहे. त्यांना वनपट्टे दिले जात असल्याचे सांगितले जात असले तरी जमिनीचा ताबा मिळत नसून त्यांचे हक्क आणि डावलले जात असल्याचे राज्यपालांनी सांगितले. संविधानाने दिलेल्या अधिकाराप्रमाणे एखाद्या प्रकल्पाच्या विरोधात ग्रामसभेने ठराव घेतल्यानंतरही आदिवासींच्या जमिनीवर प्रकल्प उभे राहात आहेत. त्यांना जबरदस्तीने गाडीत घालून त्यांच्या सह्या अथवा अंगठे घेतले जात असल्याचे झारखंडमध्ये उभारण्यात येणाºया एका स्टील प्लांटचे नाव घेता त्यांनी सांगितले. अशी जबरदस्ती केली जात असेल तर ती सहन केली जाणार नाही, असेही राज्यपाल उईके यांनी सांगितले.

जल, जंगल आणि जमीन या आदिवासी समाजाच्या महत्त्वपूर्ण बाबी वाचविण्यासाठी जगभरातील आदिवासींनी एकत्र येण्याची गरज युनोचे चौधरी यांनी विशद करीत हे वाचविण्यात आपल्याला अपयश आल्यास आदिवासींचे अस्तित्व धोक्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. मानवी उत्क्रांतीनंतर धान्याच्या माध्यमातून पहिली गुलामी आपण स्वीकारल्याचे सांगून शस्त्र, शास्त्र, पैसे आणि आता डिजिटलच्या गुलामीत आपण अडकल्याचे अशोक चौधरी यांनी निदर्शनास आणून दिले.

मूल्यवान अशी आदिवासी संस्कृती टिकवून ठेवणाºया समाजात जन्माला आल्याचा आपल्याला अभिमान वाटत असल्याचे सांगून देशात विकासाच्या नावाखाली उभारलेल्या इमारती आणि प्रकल्पात विटा आणि घाम आमचा असल्याचे मध्य प्रदेशचे मंत्री मरकाम यांनी सांगितले.

शिक्षणाशिवाय आपली प्रगती होऊ शकत नसल्याचे सांगून आपली होणारी लूट रोखण्यासाठी एकत्र येण्याची गरज व्यक्त केली, तर आदिवासी एकता परिषदेच्या स्थापनेपासून चळवळीत असल्याचा अभिमान असल्याचे सांगून जमिनीचे खरे रक्षणकर्ते असतानाही आम्हाला रानटी समजले जात असल्याचा खेद व्यक्त करीत आम्ही खरे विज्ञानवादी असल्याचे खा. गावितांनी सांगितले.
 

Web Title: Tribal people are tortured even today! The reality of social bonds laid down by the governors of Chhattisgarh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.