भात खरेदी केंद्रावरील कर्मचारी ‘लेट लतिफ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2020 01:17 AM2020-02-23T01:17:59+5:302020-02-23T01:18:02+5:30

नवीन कर्मचारी देण्याची मागणी; शेतकऱ्यांचा वेळ व पैसा जातो वाया

Staff at Paddy Shopping Center 'Late Latif' | भात खरेदी केंद्रावरील कर्मचारी ‘लेट लतिफ’

भात खरेदी केंद्रावरील कर्मचारी ‘लेट लतिफ’

Next

पारोळ : शिरवली भात खरेदी केंद्रावर ठेवण्यात आलेले कर्मचारी वेळेवर येत नसल्याने व काही भात खरेदी केंद्रावर भात घेऊन आलेल्या शेतकऱ्यांना भात केंद्राबाहेर ठेवावे लागत आहे. यामुळे शेतकºयांचा वेळ व पैसा वाया जात असल्याने परिसरातील शेतकरी अडचणीत असून खरेदी केंद्राला नवीन कर्मचारी द्यावा, अशी मागणी होत आहे.

सरत्या वर्षी अस्मानी संकटाने कोलमडलेल्या बळीराजाला येणारे नवीन वर्ष हे शुभ संकेत देणारे ठरले. या वर्षी आधारभूत भात खरेदी केंद्रावर क्विंटलमागे दरात व देण्यात येणाºया बोनसमध्ये वाढ झाल्याने या वर्षी ही दरवाढ बळीराजाला दिलासा देणारी होती. मागील वर्षी क्विंटलमागे १७५० व बोनस २०० रुपये असा शासनाचा भाताला हमीभाव होता. पण या वर्षी दरात वाढ होत १८५० व बोनस ५०० असा दर लागू झाल्याने शेतकरी बांधवांसाठी ही समाधानाची बाब आहे, मात्र महामंडळाकडे कर्मचारी कमी असल्यामुळे शेतकरीवर्गाला भातविक्री करताना अडचण येत आहे. भात पीक घेणे हे आता शेतकरी यांच्यासाठी महागडे ठरत असून बी-बियाणे, खते, औषधे, मजुरी, टॅक्टरचे वाढणारे दर, निसर्गाचा लहरीपणा यामुळे शेतकºयांना भात पीक घेणे परवडत नाही. काही शेतकरी दागिने गहाण ठेवत तर काही सेवा सोसायटीचे कर्ज घेत भात पिकांची लागवड करतात. पीक लागवडीचा खर्च वजा केला असता त्यांच्या हातात काहीच उरत नाही. जर हे भात जर व्यापारी वर्गाला विकले तर त्यांचा दर हा क्विंटल मागे १२०० ते १५०० असा आहे. त्यामुळे व्यापारी वर्ग शेतकरी वर्गाची मोठी पिळवणूक करतात. त्यामुळे वसईतील शेतकरी यांच्या भात विक्रीसाठी राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्यादित प्रादेशिक कार्यालय जव्हार अंतर्गत वसई तालुक्यात दोन भात केंद्रांना सुरुवात करण्यात आली. शिरवली, मेढे व भिनार या ठिकाणी भात खरेदी सुरू करण्यात आली.

कर्मचारी एकच
महामंडळाकडे कर्मचारी कमी असल्याने या तीन ठिकाणची जबाबदारी एकाच कर्मचाºयावर देण्यात आली. प्रत्येक खरेदी केंद्राला आठवड्याचा वार ठरवून ती करण्यात आली. पण एक दिवस खरेदी असल्याने शिरवली खरेदी केंद्रावर शेतकरी वर्गाची गर्दी होत असल्याने सर्व शेतकरी यांची भात खरेदी होत नसल्याचे व मला रोज जव्हार वरून ये-जा करावी लागत असल्याने काही वेळा उशीर होत असल्याचे भात खरेदी केंद्र कर्मचारी इंगोले यांनी सांगितले.

Web Title: Staff at Paddy Shopping Center 'Late Latif'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.