Power supply cut off, Vasai Virar city's Ghagar Utani! | वीजपुरवठा खंडीत, वसई विरार शहराची घागर उताणी !

वीजपुरवठा खंडीत, वसई विरार शहराची घागर उताणी !

आशिष राणे 

पालघर - वसई विरार शहर महानगरपालिकेस पाणी पुरवठा करणाऱ्या सूर्या धरणाच्या मासवण पंपिंग स्टेशन आणि धुकटन फिल्टर प्लांट येथे विद्युत पुरवठा करणारा वीज कंपनीचा इलेक्ट्रिक पोल तीन ते चार दिवसापूर्वी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे झुकला असून त्याचा स्टे पण तुटुन निघाला आहे. 
दरम्यान पुढील काळात काही अपघात होऊ नये म्हणून येथील विजेचा पोल बदलणे आवश्यक आहे, त्यासाठी सोमवार दि.13 जुलै रोजी सकाळी 10 ते दु.4  पर्यंत वीज कंपनीचे शटडाऊन राहणार आहे.

परिणामी या वेळेत धुकटन फिल्टर प्लांट व  मासवण पंपिंग स्टेशन येथील विदुयत पुरवठा खंडित होणार असल्याने या वेळेत सूर्या धरणातून होणारा पाणी पुरवठा पूर्ण पणे बंद राहणार असल्याने सोमवारी वसई विरार शहरात होणारा पाणी पुरवठा अनियमित व कमी प्रमाणात होईल असे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तरी ही नागरिकांनी महापालिकेस सहकार्य करावे व पाणी जपून वापरण्यात यावे असे आवाहन वसई विरार महापालिकेच्या
पाणी पुरवठा विभागाने केलं आहे

Web Title: Power supply cut off, Vasai Virar city's Ghagar Utani!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.