Palghar Lockdown: जिल्ह्यात ५ एप्रिलपासून कडक निर्बंध लागू; वसई-विरार महापालिकेला वगळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 12:48 AM2021-03-27T00:48:42+5:302021-03-27T00:49:04+5:30

पालघर जिल्ह्यात लॉकडाऊनच्या काळात दुकान, मॉल सकाळी ७ ते संध्याकाळी ७ पर्यंतच सुरू राहणार आहेत.

Palghar Lockdown: Strict restrictions imposed in the district from April 5; Excluded Vasai-Virar Municipal Corporation | Palghar Lockdown: जिल्ह्यात ५ एप्रिलपासून कडक निर्बंध लागू; वसई-विरार महापालिकेला वगळले

Palghar Lockdown: जिल्ह्यात ५ एप्रिलपासून कडक निर्बंध लागू; वसई-विरार महापालिकेला वगळले

Next

नालासोपारा : पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत शुक्रवारी झालेल्या बैठकीत पालघरमध्ये ५ एप्रिलपासून कडक निर्बंध जाहीर केले आहेत. यावेळी काय बंद आणि काय चालू राहणार याचीही माहिती दिली आहे. हे निर्बंध वसई-विरार महापालिका अंतर्गत क्षेत्रासाठी लागू राहणार नसल्याचे ही सांगितले.

पालघर जिल्ह्यात लॉकडाऊनच्या काळात दुकान, मॉल सकाळी ७ ते संध्याकाळी ७ पर्यंतच सुरू राहणार आहेत. यातून दूध, पेट्रोल पंप आणि अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांना वगळण्यात आले आहे. सार्वजनिक ठिकाणी सकाळी ७ ते संध्याकाळी ७ पर्यंतच प्रवेश देणार आहे. सार्वजनिक समारंभासाठी आता प्रशासन पूर्व परवानगी आवश्यक आहे. १५ एप्रिल २०२१ पासून सार्वजनिक समारंभावर संपूर्ण बंदी असणार आहे. हॉटेल आणि बार रात्री ९ पर्यंतच प्रवेश दिला जाणार आहे. तर, हॉटेलवाल्यांना ग्राहकांच्या घरी डिलिव्हरीसाठी ११ वाजेपर्यंतची मुभा देण्यात आली आहे. हातगाडी, फेरीवाले यांना रात्री ८ पर्यंतची वेळ देण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी जास्तीत जास्त ५० टक्के उपस्थिती ठेवण्यासाठी सांगितले आहे. याबाबत जिल्हाधिकारी यांनी गाईडलाईन परिपत्रक शुक्रवारी संध्याकाळी काढले आहे.

दरम्यान, पालघर जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये व काेचिंग क्लास पुढील आदेश मिळेपर्यंत पूर्णपणे बंद राहणार आहेत. दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची उपस्थिती पालकांच्या संमतीने इच्छेनुसार राहणार आहे. 

Web Title: Palghar Lockdown: Strict restrictions imposed in the district from April 5; Excluded Vasai-Virar Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.