‘माझा कार्यकर्ताच आता आमदार होणार’

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2019 12:17 AM2019-09-17T00:17:27+5:302019-09-17T00:17:37+5:30

कित्येक वर्षांपासून लागलेला अविकासाचा कलंक पुसण्यासाठी आता अंग झटकून कामाला लागा.

'My worker will now be MLA' | ‘माझा कार्यकर्ताच आता आमदार होणार’

‘माझा कार्यकर्ताच आता आमदार होणार’

googlenewsNext

जव्हार : कित्येक वर्षांपासून लागलेला अविकासाचा कलंक पुसण्यासाठी आता अंग झटकून कामाला लागा. ही निवडणूक आपल्यासाठी खूप महत्त्वाची असून सत्तेतल्या शहाण्यांना आता खाली खेचणे गरजेचे आहे. यामुळे अभी नहीं तो कभी नही, असा लढा आपल्याला द्यावा लागणार आहे. माझा प्रत्येक कार्यकर्ता हा आमदार असणार आहे असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनिल भुसारा यांनी विक्रमगड विधानसभा क्षेत्राच्या आढावा बैठकीत केले.
कित्येक वर्षापासून भाजपाचा आमदार नंतर मंत्रीही झाले. मात्र येथील आदिवासी बांधव आजही मूलभूत गरजांसाठी झटत आहे. ही निवडणूक जिंकली तर पुढील सर्व निवडणुका आपण जिंकणार असल्याने विधानसभा जिंकून पुढील सर्व निवडणुकांची बीजे आपल्याला रोवायची आहेत. आपण आजवर आमदार या लाभाच्या पदापासून लांब राहिल्याने आपला विकास खुंटला. मात्र आता आपले हे दुर्दैव पुसण्यासाठी आपण तन मनाने काम करायला हवे. लोकसभेत चांगले काम करून ‘हम किसीसे कम नही’, हे दाखवून दिले. त्याच पद्धतीचे काम आगामी दिवसांत करण्याचे आवाहन यावेळी भुसारा यांनी केले. आज आम्ही जे काही आहोत आणि जे काही करायचेय यासाठी आमची सर्व भिस्त कार्यकर्त्यांवर असल्याचेही ते म्हणाले.
यावेळी विक्रमगड विधानसभा अध्यक्ष प्रमोद कोठेकर, जिल्हा सरचिटणीस अशोक चौधरी, विक्र मगड तालुकाध्यक्ष शिवा सांबरे, वाडा तालुकाध्यक्ष रोहिदास पाटील, जव्हार तालुकाध्यक्ष कमळाकर धुम, मोखाडा तालुकाध्यक्ष अशोक मोकाशी आदी उपस्थित होते.
>राष्ट्रवादीचाच आमदार हवा
राष्ट्रवादीचा आमदार पाहिजे, अशीच येथील जनसामान्यांची भावना आहे. येथील विकासासाठी बदल हवाच. यामुळे या निवडणुकीत आम्ही आपल्या पाठीशी असल्याचे मत या बैठकीत अनेक कार्यकर्त्यांनी व्यक्त केले. येत्या २५ दिवसांत जे मला वेळ देतील त्यांच्यासाठी माझा येणारा प्रत्येक क्षण असेल असे वचन भुसारा यांनी यावेळी दिले.

Web Title: 'My worker will now be MLA'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.