मोहित राठोर, किरण सहदेवने उमटवला ठसा;  वसई-विरार महापौर स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2019 01:58 AM2019-12-09T01:58:57+5:302019-12-09T01:59:13+5:30

वसई-विरार महापौर मॅरेथॉन स्पधेर्चे यंदाचे नववे पर्व होते. या महापौर मॅरेथॉनला राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाल्याने देशभरातील विविध राज्यातील स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले होते.

Mohit Rathore, Kiran Sahadev made the mark; Spontaneous response to the Vasai-Virar Mayor contest | मोहित राठोर, किरण सहदेवने उमटवला ठसा;  वसई-विरार महापौर स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

मोहित राठोर, किरण सहदेवने उमटवला ठसा;  वसई-विरार महापौर स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

googlenewsNext

विरार : वसई-विरार महापौर मॅरेथॉन स्पधेर्चे यंदाचे नववे पर्व होते. या महापौर मॅरेथॉनला राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाल्याने देशभरातील विविध राज्यातील स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले होते. स्त्री भ्रूण हत्या टाळा, निसर्ग समतोल पाळा, स्वच्छ वसई, हरित वसई, एक्सपिरियनस द रन अशा आशयाचे संदेश देत ही स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाली.

फुल मॅरेथॉनमध्ये पुरुषांमधून भारतीय सेनेच्या मोहित राठोर याने तर महिलांमध्ये पश्चिम रेल्वेच्या किरण सहदेव यांनी आपला ठसा उमटवला. मोहित राठोरने २ तास २४ मिनिटे २२ सेकंदांत ही स्पर्धा पूर्ण केली. तर किरण सहदेवने १ तास १७ मिनिटे १५ सेकंदात ही स्पर्धा पूर्ण केली. दरम्यान, पुरुषांच्या अर्धमॅरेथॉनमध्ये भागेश पाटीलने, तर महिलांमध्ये आराधना सिंह प्रथम आली. स्पर्धा पाहण्यासाठी नागरिकांनी देखील रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती.

महापालिका आणि पोलीस कर्मचारी, अधिकारी यांनीही या मॅरेथॉनमध्ये सहभाग पाहायला मिळाला. पालघरचे जिल्हाधिकारी कैलाश शिंदे, पालिका अतिरिक्त आयुक्त रमेश मनाळे आणि उपपोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांनीही या वेळी सहभागी होऊन स्पर्धकांचा उत्साह वाढविला.

‘स्त्रीभ्रूणहत्या टाळा’, ‘निसर्ग समतोल पाळा’, ‘स्वच्छ वसई - हरित वसई,’ ‘एक्सपिरियन्स द रन’ अशा आशयाचे संदेश देत ही स्पर्धा रविवारी उत्साहात पार पडली. अबालवृद्ध, तरुण, बालके यांनी विरार विवा कॉलेज परिसरातील रस्ते फुलून गेले होते. संगीताच्या तालावर टाळ्यांची दाद देत वसईतील नागरिक स्पर्धकांचे मनोबल वाढवत होते. या वेळी पोलिसांनीही चोख बंदोबस्त ठेवला होता. पण या महापौर मॅरेथॉनमध्ये आकर्षक ठरलेली स्पर्धा म्हणजे ‘फन रन’.

पहाटेच्या थंड वातावरणात सकाळी ठीक सहाच्या ठोक्याला वसई-विरार शहर महानगरपालिका आयोजित महापौर मॅरेथॉनला सुरुवात झाली. स्पर्धा मार्गावर पडलेले धुके, रस्त्याच्या दुतर्फा शालेय विद्यार्थी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित असल्याने स्पर्धकांचा उत्साह वाढला होता.

स्पर्धकांसह, पाठिराख्यांचा, बघ्यांचा उत्साह ओसंडून जात असल्याने एकूणच वातावरण उत्साही झाले होते. स्पर्धेत पूर्ण मॅरेथॉन, अर्धमॅरेथॉनबरोबरच ‘फन रन’मध्येही मोठ्या प्रमाणात स्पर्धक सहभागी झाले होते. ‘फन रन’मधून स्पर्धकांनी जनतेला अनेक सामाजिक संदेश दिले. शौचालय बांधा, प्लास्टिक हटवा, पर्यावरण वाचवा, पक्षी वाचवा, इ. प्रकारचे सामाजिक संदेश देत महाराष्ट्र संस्कृतीचे दर्शन ‘फन रन’मध्ये दिसून आले.

दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील सिनेसृष्टीतील अनेक सेलिब्रिटींनी या ठिकाणी सकाळी ६ वाजल्यापासून उपस्थिती लावली होती. यात राजपाल यादव, सुदेश बेदी, अभिजीत चव्हाण, पुष्कर क्षोत्री, तसेच इतर सिनेकलाकारांसोबत आमदार हितेंद्र ठाकूर, महापौर सुरेश शेट्टी, पालघर जिल्हाधिकारी कैलास शिंदे, माजी महापौर राजीव पाटील, अजीव पाटील, वसई तहसीलदार किरण सुरवसे आदी मान्यवरांनी या मेरेथॉनला हजेरी लावली होती. या मेरेथॉनमध्ये पालघर जिल्हाधिकारी यांनीही भाग घेतला होता.

बलात्कार प्रकरणावर सामाजिक संदेश

हैदराबादमधील ‘दिशा’ बलात्कार आणि हत्या प्रकरण ताजे असताना व देशभरात बलात्काराच्या घटना वाढत असताना वसई-विरार महापौर मॅरेथॉनमध्ये बलात्कार प्रकरणात पीडितेला कशा प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते, यावर आधारित सामाजिक संदेश देणारी मॅरेथॉन काढण्यात आली. ‘इन्सानियत कहा है?’ अशा आशयाचे बॅनर झळकावीत या ‘फन रन’मधल्या सामाजिक संदेशावर आधारीत मॅरेथॉनला सुरुवात झाली.

यानंतर महिलेला कशा प्रकारे सर्रासपणे छेडले जाते हे दाखवले जाते, तसेच पीडितेकडे वाईट नजरेने पाहात तिच्याच चारित्र्यावर संशय व्यक्त करत वाईट वागणूक दिली जाते. शेवटी आरोपींना पकडून त्यांची रस्त्यावर धिंड काढली जाते. विशेष म्हणजे प्रत्येक देशात बलात्कार प्रकरणी कायदा काय आहे, तेही या मॅरेथॉनमध्ये दाखवण्यात आले. विवा कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी ही मॅरेथॉन काढली. ही मॅरेथॉन असंख्य लोकांच्या पसंतीस उतरली. या मॅरेथॉनच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी दिलेला संदेश असंख्य लोकांपर्यंत पोहोचला.

Web Title: Mohit Rathore, Kiran Sahadev made the mark; Spontaneous response to the Vasai-Virar Mayor contest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.