शिक्षक भरती प्रकियेत घोळ; बेरोजगारांचा आदिवासी प्रकल्पाला घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 12:18 AM2019-09-25T00:18:31+5:302019-09-25T00:18:39+5:30

स्थानिकांना डावलून परजिल्ह्यातील उमेदवारांना प्राधान्य

Mix in teacher recruitment process | शिक्षक भरती प्रकियेत घोळ; बेरोजगारांचा आदिवासी प्रकल्पाला घेराव

शिक्षक भरती प्रकियेत घोळ; बेरोजगारांचा आदिवासी प्रकल्पाला घेराव

Next

डहाणू : पालघर जिल्हह्यातील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प डहाणू आणि जव्हार अंतर्गत ११ महिन्यांच्या कंत्राटी करारावर कला शिक्षकांसाठी जाहिरात देऊन आॅनलाईन पद्धतीने आवेदन पत्र मागविण्यात आली होती. त्यांची कागदपत्रे पडताळणी प्रक्रिया ४ आणि ५ सप्टेंबर रोजी पार पडली. मात्र यावेळी झालेल्या कागदपत्र पडताळणी प्रकियेत मोठ्या प्रमाणात चुका असल्याने स्थानिक अदिवासी बेरोजगार तरु णांना त्याचा फटका बसला आहे.

पहिल्या यादीत गोंधळ झाला असताना प्रसिद्ध केलेल्या दुसऱ्या यादीतही अनेक तांत्रिक चुकांसह सदोष यादी प्रसिद्ध केल्याने संतप्त स्थानिक आदिवासी तरु णांनी सोमवारी डहाणू आदिवासी विकास प्रकल्पाला घेराव घातला. मात्र आचारसंहिता लागल्याने या प्रकरणाची चौकशी होईपर्यंत निवड झालेल्या उमेदवारांना थांबावावे लागणार आहे.

डहाणू आणि जव्हार प्रकल्पातील आश्रम शाळांवर कंत्राटी कला शिक्षक पदासाठी ११ महिन्यांच्या करारावर जाहिरात देऊन आॅनलाईन पध्दतीने आवेदन पत्र मागविण्यात आले होते. त्याची कागदपत्र पडताळणी प्रकिया पार पडून निवड केलेल्या उमेदवारांची अंतिम यादी जाहीर करण्यात आली. या भरती प्रकियेत स्थानिकांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत असले तरी, स्थानिकांना डावलून परजिल्ह्यातील उमेदवारांना प्राधान्य देण्यात आले आहे. स्थानिकांची कागदपत्रे पूर्ण असताना त्यांना अपात्र ठरविले असून परजिल्ह्यातील उमेदवारांनी एक किंवा दोन पुरावे जोडले असतानाही त्यांना पात्र ठरविण्यात आले आहे. तर स्थानिक उमेदवार कागदपत्र पडताळणीसाठी हजर असूनही त्यांना गैरहजर दाखविण्यात आले आहे. शैक्षणिक पात्रता असून सुद्धा कागदपत्रे घेतली नाहीत.

तर कागदपत्रे पडताळणी करणाºया कर्मचाऱ्यांना कला शिक्षक पदवी व कार्यानुभव यांच्यातील फरक सुद्धा कळत नव्हता. त्यामुळे गोंधळ होत होता असे स्थानिक उमेदवारांकडून सांगण्यात येत आहे. या भरती प्रकियेसाठी ४ सप्टेंबरला कागदपत्र पडताळणी झाली असली तरी ज्या उमेदवारांकडे काही कागदपत्र कमी होती. त्यांना ती ५ सप्टेंबरला जमा करण्याची मुभा देण्यात आली होती. मात्र ती कार्यालयात जमा करूनही त्यांची नोंद का केली नाही? याविषयी स्थानिक उमेदवारांनी शंका व्यक्त केली आहे. शैक्षणकि वर्ष २००९ पासून ते २०१८ पर्यंत डहाणू आदिवासी प्रकल्पातील शासकीय आश्रम शाळांमध्ये शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून गेली ९ वर्षे विद्यार्थ्यांना संगणक शिकवण्याचे काम करणाºया अनेक शिक्षकांना या नवीन धोरणाचा फटका बसला आहे.

कला शिक्षक भरतीसाठी स्थानिकांनी सर्व स्थानिक कागदपत्र जमा केली असतानाही त्यांना परजिल्ह्यातील उमेदवार दाखिवण्यात आले असल्याचे विक्रमगड तालुक्यातील आदिवासी स्थानिक उमेदवार निर्मला सुरेश कव्हा यांनी सांगितले. असे ६ उमेदवार आहेत. कागदपत्र पडताळणीसाठी हजर असून सुद्धा गैरहजर दाखविलेले ३, कमी गुण दिलेले ४ उमेदवार आहेत.

भरती प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह
स्थानिकांना परजिल्ह्यातील उमेदवार जाहीर करून परजिल्ह्यातील उमेदवारांना मात्र स्थानिक दाखवून त्यांना भरती प्रकियेत प्राधान्य देण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जोपर्यंत या भरती प्रकियेतील घोळ दूर होत नाही. संबंधित दोषींवर कायदेशीर कारवाई होत नाही. तोपर्यंत कला शिक्षक उमेदवारांची नियुक्ती थांबवावी, पात्र उमेदवारांना त्रूटी दाखवून वगळले आहे. त्यांचा विचार करण्यात यावा, अशी स्थानिक उमेदवारांनी मागणी आहे. या संपूर्ण भरती प्रकियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून जर स्थानिक आदिवासी उमेदवारांना भरती प्रकियेतून जाणीवपूर्वक डावलले गेले तर आदिवासींच्या न्याय हक्कासाठी उग्र आंदोलन केले जाईल, असा इशारा आदिवासी एकता परिषदेचे डॉ. सुनिल पºहाड यांनी दिला आहे.

आश्रम शाळा कला शिक्षक भरती प्रकियेत पात्र उमेदवारांना संधी दिली जाणार आहे. आचारसंहिता संपल्यानंतरच त्रूटी दूर करता येतील.
- सौरभ कटियार, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी, डहाणू

Web Title: Mix in teacher recruitment process

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.