पर्यटकांना पाण्याच्या ठिकाणी जाण्यास मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयाने घातली बंदी 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2021 05:33 PM2021-06-24T17:33:43+5:302021-06-24T17:42:17+5:30

Mira Bhayander And Vasai Virar : मीरा भाईंदर - वसई विरार हद्दीत विस्तीर्ण समुद्रकिनारा असून या समुद्रकिनारी मोठ्या संख्येने हॉटेल, लॉज आहेत.

Mira Bhayander - Vasai Virar Police Commissionerate bans tourists from entering water bodies | पर्यटकांना पाण्याच्या ठिकाणी जाण्यास मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयाने घातली बंदी 

पर्यटकांना पाण्याच्या ठिकाणी जाण्यास मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयाने घातली बंदी 

googlenewsNext

मीरा रोड - पावसाळ्यात समुद्र, धबधबे, धरण, नदी, खाडी, तलाव आदी पाण्याच्या ठिकाणी जाण्यास मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयाने १८ ऑगस्टपर्यंत बंदी घातली आहे. त्यासाठी कलम १४४ नुसार फौजदारी मनाई आदेश पोलीस उपायुक्त विजयकांत सागर यांनी जारी केला आहे. 

मीरा भाईंदर - वसई विरार हद्दीत विस्तीर्ण समुद्रकिनारा असून या समुद्रकिनारी मोठ्या संख्येने हॉटेल, लॉज आहेत. समुद्रकिनारी पर्यटक तसेच मद्यपी मोठ्या संख्येने मौजमजेसाठी जात असतात. पावसाळ्यात समुद्र खवळलेला असतो. उंच लाटा उसळत असतात. अशा प्रसंगात समुद्रकिनारी, समुद्राच्या पाण्यात उतरणार्‍या पर्यटकांच्या जीवाला धोका असतो. समुद्रात बुडून मरण पावल्याच्या घटना नेहमीच घडत असतात. 

तशीच परिस्थिती ही चिंचोटी सारख्या धबधब्याच्या ठिकाणी असते. पावसात या ठिकाणी पर्यटक पाण्यात वाहून मरण पावल्याच्या घटना घडत असतात. काशीमीरा पोलीस ठाणे हद्दीतील चेणे गावात असलेल्या लक्ष्मी नदीत सुधा अनेक तरुण मद्यपी पार्टी झोडायला जात असतात. नदीत पोहायला उतरणारे अनेक जण बुडून मरण पावल्याच्या घटना दर वर्षी घडत असतात. त्या अनुषंगाने पावसाळ्यात जीवित हानी रोखण्यासाठी पोलीस उपायुक्तांनी मनाई आदेश जारी केला आहे.  १८ ऑगस्ट पर्यंत समुद्र, धबधबे, नदी, धरण आदी पाण्याच्या ठिकाणी जाण्यास तसेच पाण्यात उतरण्यास पर्यटकांना कायद्याने बंदी घालण्यात आलेली आहे.

सदर ठिकाणी सेल्फी काढणे, मद्यपान करणे, मध्य विक्री करणे, ध्वनीक्षेपक डीजे वाजवणे, रस्त्यांवर वाहने थांबवणे, प्लास्टिक- थर्माकोलचा कचरा टाकणे आदींवर बंदी घातली आहे. ध्वनी, वायु व जल प्रदूषण केल्यास कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. या बंदी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई केली जाणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. 

 

Web Title: Mira Bhayander - Vasai Virar Police Commissionerate bans tourists from entering water bodies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.