मासवणे, बावघरमधील शेतकऱ्यांचे जीवनमान बदलले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2020 11:42 PM2020-02-19T23:42:56+5:302020-02-19T23:43:07+5:30

विविध भाजीपाल्यांचे उत्पादन : जि.प.च्या सेस फंडातून पाणी योजना, पूर्वी पावसाळ्यातच घेतले जायचे पीक

Massively, the livelihoods of the farmers in the Bavaria changed | मासवणे, बावघरमधील शेतकऱ्यांचे जीवनमान बदलले

मासवणे, बावघरमधील शेतकऱ्यांचे जीवनमान बदलले

Next

जनार्दन भेरे 

भातसानगर : केवळ पावसाळा वगळल्यास कधीही पाण्याखाली न येणारी जमीन पाण्याखाली आणून अनेक भाजीपाल्यांचे उत्पादन मासवणे व बावघर येथे घेतले जात आहे. यामुळे दोन्ही गावांतील शेतकऱ्यांचे जीवनमान बदलले आहे. शहापूर तालुक्यातील मासवणे व बावघर ही गावे मागासलेलीच आहेत. केवळ पावसाळ्यात एकमेव पीक घ्यायचे, त्याव्यतिरिक्त दुसरे पीक नाही वा व्यवसाय नाही. मात्र, गावाची एकी असेल तर काहीच अशक्य नाही. मग, एकच गाव नाही तर दोन गावांतील शेतकरी एकत्र आले आणि दोन किलोमीटर अंतरावरून वाहत असलेल्या काळू नदीच्या पाण्याचा वापर करायचे ठरले.

हे सगळे जुळून आले तरी पैशांचे सोंग काही आणता येत नाही. मग, या दोन्ही गावांतील २३ शेतकºयांनी एकत्र येऊन आपली कैफियत पंचायत समितीचे कृषी अधिकारी विलास झुंजारराव यांना सांगितली. यामध्ये एकनाथ तिवरे,गोविंद तिवरे, लहू मुकणे, लक्ष्मण मुकणे, मल्हारी तिवरे यांचा समावेश होता. विस्तार अधिकारी सचिन गंगावणे यांनी जोड देत या सर्वांसाठी जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून एक योजना तयार करून या गावांसाठी ३६४ पीव्हीसी पाइप, साडेसात हॉर्सपॉवरची मोटार अशी दोन लाख रु पयांची योजना मंजूर करून घेतली. या गावातील शेतकºयांनी त्याचा फायदा घेऊन ही पाइपलाइन आपल्या गावात आणली. तुडुंब भरलेल्या काळू नदीच्या पाण्याचा योग्य वापर शेतकºयांनी करून आपल्या शेतीत अनेक प्रकारचा भाजीपाला घेण्यास सुरुवात केली. आज यामुळे शेतकºयांचे जीवनमान तर बदलले, मात्र पाणीटंचाईचा प्रश्नही सुटल्याचा आनंद ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.
शिवाय, ३० ते ३५ हेक्टर क्षेत्र पाण्याखाली आल्याने भाजीपाला, शेतीस उपयुक्त ठरत आहे. विशेष म्हणजे पंचायत समितीचे उपसभापती पद्माकर वेखंडे, पंचायत समिती सदस्य प्रकाश वीर, प्रकाश भांगरथ यांनी भेट दिली.

या दोन गावांतील शेतकºयांना एकत्र करून सर्वांसाठी पाइप व मोटार मंजूर करून ही योजना उत्तम रीतीने पूर्णत्वास आणून गावांना त्याचा फायदा झाला, याचा नक्कीच आम्हाला आनंद आहे. अशा आणखी दोन ते तीन योजना करण्याचा आमचा मानस आहे.
- विलास झुंजारराव, कृषी अधिकारी
आजपर्यंत पावसाळ्याच्या पाण्याव्यतिरिक्त पाणी नव्हते. मात्र, या योजनेमुळे आम्हाला आनंद तर झाला आहेच, पण आम्ही मोठ्या प्रमाणावर भाजीपालाही लावला आहे व उत्पादनही घेणे सुरू केले आहे. आम्ही नक्कीच या संधीचे सोने करू.
- इंदूबाई वाळकू, शेतकरी
 

Web Title: Massively, the livelihoods of the farmers in the Bavaria changed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.