कोकणातील फ्रूट वाईनवर फक्त एक रुपया अबकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2019 11:40 PM2019-09-05T23:40:13+5:302019-09-05T23:40:52+5:30

फणस, जांभूळ, करवंदे, हापूस, कोकम : याच्या वाइनरीज आता सुरू होणार

Just one rupee on Fruit Wine in Konkan | कोकणातील फ्रूट वाईनवर फक्त एक रुपया अबकारी

कोकणातील फ्रूट वाईनवर फक्त एक रुपया अबकारी

Next

विक्रमगड : कोकणातील सर्व फळांपासून बनविण्यात येणाऱ्या वाईनला आता एका लिटर मागे एक रुपया एक्साईज ड्युटी लागणार. आजपर्यंत अशी सवलत फक्त द्राक्ष वाईनला मिळत होती. द्राक्षाला १०० टक्के एक्साईज माफ होती. आता या पूढे कोकणातील जांभुळ, आंबा, चिकू, करवंद , अननस या वाईन पश्चिम महाराष्ट्रातील द्राक्ष वाईन प्रमाणे प्रसिद्धीस येतील.

कोकणात मोठी क्रांती आणण्याच्या या निर्णयासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस, उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे मनपूर्वक अभिनंदन करण्यात येत असुन याचा सातत्याने पाठपुरावा करणारे कोकण पर्यटन उदयोग संघाचे संस्थापक माधवराव भंडारी, समृद्ध कोकण संघटनेचे संस्थापक संजय यादवराव, कोकण पर्यटन उदयोग संघ वाईन उदयोग समन्वय समिती प्रमुख प्रियांका सावे व श्रीकांत सावे या सर्वांचे देखील धन्यवाद देण्यात आले.
बोर्डी येथील हिलझिल या पर्यटन केंद्राचे मालक श्रीकांत सावे यांनी कोणतीही शासकीय सवलत नसताना स्वत:ची गुंतवणूक चिकू, आंबा व

मधापासून वाईन बनवणाºया उद्योगांमध्ये केली. आज त्यांनी बनवलेल्या नाविन्यपूर्ण वाइन्स अतिशय लोकप्रीय आहेत व सुला वायनरी प्रमाणे पालघर जिल्हातील बोर्डी, डहाणू येथील फ्रुझांते वाईनरी टूरिझम नावारूपास येत आहे. गेली तीन वर्ष श्रीकांत सावे यांची वाईन उद्योगात तज्ञ असलेली कन्या प्रियांका सावे व सोबत भिवा धुरी या कार्यकर्त्यांनी या विषयाचा सातत्याने पाठपुरावा केला यात नेहमीच समृद्ध कोकण संघटना, कोकण पर्यटन उद्योग संघ यांचा समन्वयात सहभाग राहिला. महाराष्ट्र पुनर्वसन प्राधिकरणाचे उपाध्यक्ष माननीय माधवराव भंडारी यांनी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व संबंधित मंत्री चंद्रशेखर बावनकुळे ज्यांच्याकडे हा सातत्याने आग्रह धरला यातून निर्णय झाला. या पुढील टप्पा, हा उद्योग डिस्टीलरी म्हणून न करता शेतीपूरक उद्योग करावा. ग्रीन इंडस्ट्रीमध्ये याचा समावेश असावा. याविषयी समृद्ध कोकण संघटनेचे संस्थापक संजय यादवराव यांनी त्यांची भूमिका मांडली. ‘देशी, विदेशी पर्यटकांना कोकणात आकर्षित करणारा हा उदयोग जर कोकणातील पर्यटन युवा उद्योजक करणार असतील, तर या उद्योगासाठी शेतकऱ्यांना व्याजामध्ये सवलत दिली जावी. फ्रान्स किंवा इटलीमध्ये वाइन टुरिझमला खूप महत्त्व आहे.
येथे पर्यटक वायनरी पाहण्यासाठी मुद्दाम जातात यातून एक अर्थव्यवस्था उभी राहिली आहे. कोकणात हापूस आंबा, चिकू, जांभूळ, करवंद यापासून वाईन बनवता येईल. यातून शेतकºयांच्या फळांना चांगला भाव मिळू शकेल. वाया जाणारी फळे उपयोगात येतील. कोकणात अनेक शेतकरी, पर्यटन व्यावसायिक लघुउद्योग म्हणून वाईनरी हा उदयोग करू शकतील. आपल्या पर्यटन उद्योगासाठी मर्यादित स्वरूपात लघुउद्योग म्हणूनही आपल्या बागांमध्ये हा उदयोग शेतकºयांना करता येईल. नाशिकच्या सुला वाइनरी प्रमाणे वायनरी पर्यटन बोर्डी, तारकर्ली, दापोली, श्रीवर्धन यासारख्या प्रत्येक प्रमुख पर्यटन केंद्राच्या अवती भोवती शक्य आहे.
आज कोकणात लाखो पर्यटक येतात, हे पर्यटन वाढण्यासाठी वायनरी टुरिझमचा कोकणात खूप उपयोग होईल. यातून त्या त्या भागात शेतकºयांना रोजगार मिळू शकतो. म्हणूनच लघुउद्योग स्वरूपात वायनरी उद्योग याला कोकण प्रदेशात प्रोत्साहन दिले पाहिजे. यातून कोकणात रोजगाराचे अजून एक नवीन क्षेत्र उभे राहील.

मद्य नव्हे हे तर हेल्थ ड्रींक
वाईन ही फळांपासून बनवली जाते अतिशय कमी प्रमाणात यात अल्कोहल असते जगभर वाईन याकडे हेल्थ ड्रिंक म्हणून पाहिले जाते. केवळ पर्यटनात नाही तर निर्यात उद्योगांमध्ये सुद्धा कोकणातील फळांपासून बनवलेली वाईन जगभर एक्सपोर्ट करता येईल. हा शेतकºयांना पर्यावरण पूरक ग्रीन उद्योग आहे म्हणूनच पुढील काळात याला कोकणात प्रोत्साहन दिले पाहिजे. वाइन उद्योगातील तज्ञ श्रीकांत सावे, प्रियांका सावे यांच्या मदतीने कोकणात हा उद्योग सर्व पर्यटनाच्या मुख्य केंद्रा जवळ व्हावा असा समृद्ध कोकण संघटनेच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करणार आहोत. अशी माहिती समृद्ध कोकणचे पालघर जिल्हा कार्याध्यक्ष रोहित पाटील यांनी दिली.

Web Title: Just one rupee on Fruit Wine in Konkan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.