अडकलेल्या बोटीला काढताना जेसीबी बुडाला; वसई-पाचूबंदर येथील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2021 09:54 PM2021-05-04T21:54:36+5:302021-05-04T21:55:37+5:30

JCB Sank : सुदैवाने जेसीबीचालक सुखरूप असल्याची माहिती कळते.

JCB sank while removing the stranded boat; Incident at Vasai-Pachubandar | अडकलेल्या बोटीला काढताना जेसीबी बुडाला; वसई-पाचूबंदर येथील घटना

अडकलेल्या बोटीला काढताना जेसीबी बुडाला; वसई-पाचूबंदर येथील घटना

googlenewsNext
ठळक मुद्देजेसीबी बाहेर काढण्यासाठी आता ओहोटीची वाट पाहावी लागणार आहे. हा प्रकार पाचूबंदर आणि मर्सिस समुद्रकिनारीच्या मध्यवर्ती भागात घडला आहे.

विरार : वसई-पाचूबंदर येथील समुद्रात अडकलेल्या एका मासेमारी बोटीला काढण्यासाठी समुद्रात गेलेला जेसीबी भरतीच्या पाण्यात बुडाल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. सुदैवाने जेसीबीचालक सुखरूप असल्याचे कळते.


वसई-पाचूबंदर येथील समुद्रकिनारी बांधून ठेवलेल्या बोटीचा दोर सुटल्याने, ही मासेमारी बोट समुद्रात वाहून गेली होती. या बोटीला काढण्यासाठी जेसीबी समुद्रात उतरविण्यात आला होता. मात्र, त्याच वेळी भरती आल्याने हा जेसीबी समुद्रात बुडाला. सुदैवाने जेसीबीचालक सुखरूप असल्याची माहिती कळते. मात्र, जेसीबी बाहेर काढण्यासाठी आता ओहोटीची वाट पाहावी लागणार आहे. हा प्रकार पाचूबंदर आणि मर्सिस समुद्रकिनारीच्या मध्यवर्ती भागात घडला आहे.

Web Title: JCB sank while removing the stranded boat; Incident at Vasai-Pachubandar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.