पालघरमधील नवीन प्रशासकीय इमारतीची केली पहाणी; पहाणीनंतर जिल्ह्यातील प्रश्न व समस्या वर घेतली आढावा बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 03:37 PM2021-07-20T15:37:05+5:302021-07-20T15:40:02+5:30

पालघर जिल्हयाच्या नविन प्रशासकीय इमारतीची पाहणी कोकण विभागीय आयुत व्हि.बी.पाटील यानी सोमवारी केली.

Inspection of new administrative building at Palghar; After the inspection, a review meeting was held on the issues and problems in the district | पालघरमधील नवीन प्रशासकीय इमारतीची केली पहाणी; पहाणीनंतर जिल्ह्यातील प्रश्न व समस्या वर घेतली आढावा बैठक

पालघरमधील नवीन प्रशासकीय इमारतीची केली पहाणी; पहाणीनंतर जिल्ह्यातील प्रश्न व समस्या वर घेतली आढावा बैठक

Next

वसई: पालघर जिल्हयाच्या  नविन प्रशासकीय  इमारतीची पाहणी  कोकण विभागीय आयुत  व्हि.बी.पाटील  यानी सोमवारी केली 
या पाहणीमध्ये त्यांनी पालघर जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद ,पोलिस  अधिक्षक अशा विविध प्रशासकीय इमारतीची  पाहणी करण्यासोबत त्यातील समाविष्ट विविध विभागाची देखील पाहणी केली, त्यांनतर  सिडकोच्या अधिकाऱ्या समेवत नवनियुक्त कोकण आयुक्तांनी आढावा बैठक घेतली.

दरम्यान कोकण आयुक्त व्ही. पाटील यांनी जिल्हा ग्रामीण रुग्णालय व त्यातील इतरत्र भागांची व तेथील इमारतीची पाहणी केली.
प्रामुख्याने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोविड उपचार  केंद्रला भेट देऊन तेथील आरोग्य अधिकारी  व कर्मचारी यांच्या कोविड नियंत्रणा  बाबत सविस्तर चर्चा केली.  यावेळी विशेषतः जिल्हा ग्रामीण रुग्णालयात उभारण्यात आलेल्या  ऑक्सिजन प्लांट (पीएलसी) ची पाहणी केली.

एकूणच या पाहणी नंतर विभागीय कोकण आयुक्त यांनी पालघर जिल्हाधिकारी यांच्या समवेत जिल्हाधिकारी कार्यालयात एक महत्त्वाची आढावा बैठक घेऊन या आढावा  बैठकीत कोविड प्रश्न व तिसऱ्या लाटेबाबत नियोजन, भुसंपादन प्रकल्प आदी प्रश्न व त्यांच्या समस्येबाबत आढावा घेण्यात आला.

कोव्हीडच्या तिसऱ्या संभावित लाटेसंदर्भात सर्वानी  दक्षता घ्यावी असे आवर्जून  निर्देश कोकण विभागीय आयुक्त व्ही पाटील यांनी अधिकारी वर्गांना दिले .या  आढावा  बैठीत  पालघर जिल्हाधिकारी  डॉ.माणिक गुरसळ ,जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सिध्दाराम सालिमठ, जिल्हा पोलिस अधिक्षक  दतात्रेय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी  डॉ. किरण महाजन,आदी विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

Web Title: Inspection of new administrative building at Palghar; After the inspection, a review meeting was held on the issues and problems in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.