पत्नीचा वियोग सहन होईना; तिच्या मृत्यूनंतर अवघ्या पाच तासांत वृद्धाने सोडला प्राण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2021 11:38 AM2021-04-29T11:38:06+5:302021-04-29T11:38:51+5:30

वसईतील रानगाव मर्सिस येथे एकाच दिवशी वृद्ध पती-पत्नीचे हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन

Husband died after five hours later death of wife in Vasai | पत्नीचा वियोग सहन होईना; तिच्या मृत्यूनंतर अवघ्या पाच तासांत वृद्धाने सोडला प्राण

पत्नीचा वियोग सहन होईना; तिच्या मृत्यूनंतर अवघ्या पाच तासांत वृद्धाने सोडला प्राण

Next

- आशिष राणे
लोकमत न्यूज नेटवर्क
वसई : वसईच्या पश्चिम भागातील रानगाव मर्सिस सांगोडेवाडी येथील वेरोनिका जॉन डायस (72 ) यांचा नुकताच हृदयविकाराच्या तीव्र धक्याने मृत्यू झाला. मात्र, त्या घटनेपाठोपाठ अवघ्या पाच तासांच्या अंतराने त्यांचे पती जॉन अंतोनी डायस (75 ) यांनाही पत्नी वियोगाचा तीव्र धक्का सहन न झाल्याने त्यांचाही मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. डायस कुटुंबावर अचानक कोसळलेल्या या संकटामुळे अवघ्या मर्सिस गावावर शोककळा पसरली आहे. 


बृहन्मुंबई महापालिका शाळेतून 28 वर्ष  शिक्षिका म्हणून सेवानिवृत्त झालेल्या वेरॉनिका गेली अडीच वर्षे पॅरेलेसिसच्या आजाराने अंथरुणास खिळलेले पती जॉन अंतोनी डायस यांच्यावर उपचार व सेवा करत होत्या. दरम्यान 25 एप्रिल, रविवारी दुपारी 1.30 वाजता वेरॉनिका यांना अचानक  हृदयविकाराचा झटका आला, त्यात त्यांचे निधन झाले. 


डायस यांची मुलं रॉजर व नेव्हील, विवाहित मुली स्विडल आणि प्रिंसिया, तथा जावई आणि मोजके नातलग यांनी एकत्रित येत रविवारी सायं. 6 वाजता मर्सिस चर्च येथे वेरॉनिका यांच्यावर अंत्यसंस्कार करून घरी परतले. आदरांजलीची घरातच प्रार्थना सुरु असतानाच बाजूच्या रूममध्ये असलेले जॉन डायस यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांनीही पत्नी पाठोपाठ जगाचा निरोप घेतला. त्यामुळे पुन्हा कुटुंबातील सदस्यांनी रात्री 8.30 वाजता जॉन यांच्यावर अंत्यसंस्कार केले. 


जॉन हे आर्मीतील निवृत्त सैनिक असून, गोरखपूर रेजिमेंटमध्ये त्यांनी 15 वर्षे देशसेवा केली होती. त्यानंतर काही वर्षे मुंबई आयकर विभागात ते कार्यरत होते. नंतर त्यांनी वसईत सिमेंट एजन्सी आणि बांधकामाचा स्वतःचा व्यवसाय सुरु केला होता. मात्र गेले अडीच वर्ष ते पॅरेलेसिसच्या आजाराचा सामना करीत होते. डायस दांपत्याच्या अश्या एकाच दिवशीच्या  जाण्याने मर्सिस आणि वसई विरार मध्ये हळहळ व्यक्त करण्यात आली. 

Web Title: Husband died after five hours later death of wife in Vasai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.