ग्रामीण भागांत प्रथा-परंपरा जपत होळींची आज होणार पूजा; स्थलांतरित मजूर परतले गावाकडे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 11:45 PM2021-03-27T23:45:23+5:302021-03-27T23:45:37+5:30

रंगपंचमीला आजही गावाकडे झाडपाला, फुलांपासून तयार केलेला नैसर्गिक रंगच वापरला जातो.

Holi will be celebrated today in rural areas keeping the customs and traditions; Migrant laborers returned to the village | ग्रामीण भागांत प्रथा-परंपरा जपत होळींची आज होणार पूजा; स्थलांतरित मजूर परतले गावाकडे 

ग्रामीण भागांत प्रथा-परंपरा जपत होळींची आज होणार पूजा; स्थलांतरित मजूर परतले गावाकडे 

Next

राहुल वाडेकर

विक्रमगड : बदलत्या काळाच्या ओघात सर्वच सणांचे रूप पालटत असले तरी अजूनही विक्रमगड तालुक्यातील ग्रामीण भागांतील शेतकरी व मजूर धुळवडीच्या उत्सवात चालत आलेल्या रुढी, परंपरा, प्रथा जपण्याचा व पारंपरिक पद्धतीने सण साजरे करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यंदा तालुक्यात दोन हजार होळ्या उभारण्यात येणार असून प्रत्येक घरातून होळीमातेची विधिवत पूजा केली जाणार आहे. तर दुसऱ्या दिवशी धुळवडीचे रंग उधळून हा उत्सव साजरा केला जाणार आहे. दरम्यान, स्थलांतरित मजूरही गावाकडे होळीसाठी परतले आहेत. 

शहरी भाग सोडला तर बहुतेक सर्वच गावखेड्यांमध्ये एक गाव एक होळीची प्रथाही आजही जपण्यात येत आहे.होळीनिमित्त महिलांनी तांदळाच्या पिठापासून दोन दिवस अगोदरच तयार केलेल्या पापड्यांचा होळीला व पूजेच्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य दाखविला जातो. होळीसाठी लहान मुले, तरुण मंडळी प्रत्येक घराघरातून लाकडे, पेंढा, गवत, बांबू गोळा करून गावाच्या मध्यभागी माळाच्या ठिकाणी (होळीची जागा) ठेवून दिले जाते. ग्रामीण भागातील महिला रात्री चंद्र उगवल्यानंतर नटूनथटून तर लहान मुले गळ्यात साखरगाठ्या (साखरेची माळ) घालून ढोलताशाच्या गजरात आरत्या घेऊन गावाच्या मध्यभागी सगळे जमतात. 

रंगपंचमीला आजही गावाकडे झाडपाला, फुलांपासून तयार केलेला नैसर्गिक रंगच वापरला जातो. वर्षातला सर्वात मोठा सण म्हणून आदिवासी भागात होळीचा सण साजरा केला जातो. होळी सणासाठी साखरेपासून बनविलेल्या हलव्याचे दागिने म्हणजेच हरडे-करडे (साखरेची गाठी व साचार गाठीचे वेगवेगळे अलंकार) यांना मोठ्या प्रमाणावर महत्त्व असल्याने ते खरेदीसाठी बाजारात गर्दी होत असते. ते हातात व गळ्यात घालून तसेच होळीला अर्पण करून होळीचा सण ग्रामीण भागात साजरा करण्यात येतो.

तारपानाच, गरबानृत्य रंगणार
नवीन लग्न झालेल्या जोडप्याने एकमेकांचे हात पकडून होळीभोवती फिरून संसाराला अग्नीपासून संरक्षण दे, आमचा राग, द्वेष, लोभ, मत्सर या आपल्या अग्नीत जळून खाक होऊ दे, अशी मनोभावे प्रार्थना केली जाते. होळी व धुळवडीच्या दोन दिवस ग्रामीण भागात खेड्यापाड्यांवर रात्रभर ढोलनाच, तारपानाच, गरबानृत्य आदी मनोरंजनात्मक कार्यक्रम केले जातात. या दोन दिवसांत होळीच्या व धुळवडीच्या दिवशी घरोघरी गोड पुरणपोळ्या केल्या जातात. 

Web Title: Holi will be celebrated today in rural areas keeping the customs and traditions; Migrant laborers returned to the village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Holiहोळी