गटारे, पाण्याचा प्रश्न सुटणार?, निरी व आयआयटी प्रस्तावाचे सादरीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2020 11:26 PM2020-02-21T23:26:52+5:302020-02-21T23:26:58+5:30

वसई-विरार महापालिका महासभा : निरी व आयआयटी प्रस्तावाचे सादरीकरण

Gutare, water question to be solved ?, Observation and presentation of IIT proposal | गटारे, पाण्याचा प्रश्न सुटणार?, निरी व आयआयटी प्रस्तावाचे सादरीकरण

गटारे, पाण्याचा प्रश्न सुटणार?, निरी व आयआयटी प्रस्तावाचे सादरीकरण

Next

वसई : वसई-विरार महापालिकेच्या मुख्यालयात गुरुवारी संध्याकाळी उशिरा सुरू झालेल्या महासभेत पहिले काही तास निरी व आयआयटीच्या प्रस्तावांचे सादरीकरण करण्यातच गेले. या महासभेत प्रामुख्याने प्रशासकीय मंजुऱ्या, ७५ लाखांवरील प्रभागातील विकासकामे, तर विविध योजना व त्यांची अंमलबजावणी याचबरोबर भगीरथ ट्रान्सपोर्ट कंपनी व त्यांच्या शहरात चालणाºया परिवहन बसेस या विषयावरील चर्चा बरीच गाजली.

परिवहन करार रद्द करणे, परिवहन समिती गठीत करणे, औद्योगिक भागात अग्निशमन दलाचे केंद्र उभारणे आदी विषयावर सविस्तर चर्चा झाली. मात्र या महासभेत परिवहन प्रश्न व शहरातील सखल भाग, बेकायदा बांधकामे, पाणी, गटारे आणि खासकरून निरी व आयआयटीने दिलेल्या सूचना व उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याबाबत सभागृहात आजीव पाटील, प्रशांत राऊत, प्रवीणा ठाकूर, उमेश नाईक तर विरोधकांमध्ये सेनेच्या किरण चेंदवणकर आदींनी विस्तृत चर्चा घडवून आणून या संदर्भातील अनेक प्रशासकीय विषयांवर सकारात्मक चर्चा व निर्णय घेण्यात आले.
शहरातील सखल भाग, बेकायदेशीर बांधकाम, गटारे, नाले, निरी व आयआयटीने दिलेल्या सूचना व उपाययोजना यांची लवकरच पावसाळ्याआधी अंमलबजावणी करण्यासाठी महासभेने मंजुरी दिली आहे. पुढील दिवसांत महापौर प्रवीण शेट्टी हे निरी व आयआयटीच्या अधिकारीवर्गाची भेट घेऊन पुढील व्यूहरचना आखतील, असेही सांगण्यात आले.
महासभेत परिवहन प्रश्न बºयापैकी गाजला, मात्र या वेळी भगीरथ ट्रान्सपोर्ट कं.ने महापालिका प्रशासनाला आपल्याला शहरात बसेस चालवणे परवडत नाही. बहुतेक बसेस नादुरुस्त आहेत. बºयापैकी रक्कम शासनाला भरणे आहे. अपघात, नासधूस, कामगार प्रश्न, त्यांचे आंदोलन व उपोषण आदी प्रश्नांमुळे मला आपण या सेवेतून मुक्त करा, असा प्रस्ताव मांडला गेला. विरोधक सेना गटनेत्या किरण चेंदवणकर यांनी या प्रस्तावाच्या बाजूने ठराव मांडला. परंतु सत्ताधारी बविआच्या सर्व नगरसेवकांनी हा करार भगीरथने पाळणे आवश्यक आहे. काही केल्या हा परिवहन करार रद्द होणार नाही, अशी भूमिका घेत भगीरथ ट्रान्सपोर्टचा पालिकेशी असलेला परिवहन करार रद्द करण्याचा प्रस्ताव महासभेत एकमताने फेटाळून लावून भगीरथ ट्रान्सपोर्टला धक्का दिला.

सुसज्ज अग्निशमन केंद्राचा विषय चर्चेस आलाच नाही
च्वसई : वसई पूर्वेकडील औद्योगिक वसाहतीमध्ये लागणाºया आगीच्या घटनांवर तत्काळ नियंत्रण मिळवण्यासाठी वसाहतीतच अग्निशमन केंद्र उभारण्याचा प्रकल्प हाती घेतला जाणार आहे. वालीव येथे अग्निशमन केंद्र उभारण्यासाठी महापालिका प्रशासनाने तीन कोटी २४ लाख रुपयांचे अंदाजपत्रक तयार
केले होते.

च्हा विषय महासभेसमोर ठेवण्यात येणार होता, परंतु परिवहन, निरी व आयआयटीसह इतर विषयांवरील चर्चेत जास्त वेळ गेल्यामुळे हा विषय चर्चेस आला नाही.मूळातच हे अग्निशमन केंद्र तयार झाल्यास औद्योगिक वसाहतीला दिलासा मिळणार आहे, मात्र या महत्त्वाच्या विषयाच्या मंजुरीसाठी पुढील महिन्यापर्यंत वाट पाहावी
लागणार आहे.

च् वसई पूर्वेला वालीव, सातिवली, गावराईपाडा, भोईदापाडा, चिंचपाडा, गोलाणी मार्ग, वसई फाटा महामार्ग या भागात मोठी औद्योगिक वसाहत आहे. या ठिकाणी मुंबईसह ठाणे, पनवेल, पालघर जिल्ह्यातील कामगार येतात. औद्योगिक भागात या ठिकाणी अनेक छोटे-मोठे कारखाने असून आगीच्या घटना अधूनमधून घडत असतात.
 

Web Title: Gutare, water question to be solved ?, Observation and presentation of IIT proposal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.