पोलीस मूलभूत सुविधांपासून वंचित, पत्र्याच्या शेडमधून चालतो कारभार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2020 12:17 AM2020-01-24T00:17:02+5:302020-01-24T00:17:22+5:30

नालासोपारा : मीरा रोड ते विरार ही सर्वाधिक गर्दीची रेल्वे स्थानके असून या स्थानकांतून लाखो प्रवासी दररोज प्रवास करीत ...

Deprived of police infrastructure | पोलीस मूलभूत सुविधांपासून वंचित, पत्र्याच्या शेडमधून चालतो कारभार

पोलीस मूलभूत सुविधांपासून वंचित, पत्र्याच्या शेडमधून चालतो कारभार

Next

नालासोपारा : मीरा रोड ते विरार ही सर्वाधिक गर्दीची रेल्वे स्थानके असून या स्थानकांतून लाखो प्रवासी दररोज प्रवास करीत असतात. या प्रवाशांच्या सुरक्षतेचा भार रेल्वे पोलिसांच्या खांद्यावर असतो. असे असतानाही मागील २० वर्षापासून हे पोलीस कर्मचारी मूलभूत सेवांपासून वंचित आहेत. केवळ भार्इंदर आणि विरार स्थानकातच रेल्वे पोलिसांसाठी अधिकृत पोलीस चौक्या आहेत. बाकी इतर स्थानकांत चक्क पत्र्याच्या शेडमध्ये कर्मचारी बसतात, तिथेच डबे खातात. रेल्वे स्थानकांत कोणत्याही सुविधा मिळत नसल्याने पोलीस कर्मचाऱ्यांना मोठा त्रास सहन करीत आपली कर्तव्ये बजावावी लागत आहेत.

पोलीस कर्मचाऱ्यांसाठी रेल्वे स्थानकात मागील २० वर्षात एकही साधी पोलीस चौकी बांधण्यात आलेली नाहीत. त्यांना बसण्यासाठी जागा नाही, पिण्यासाठी पाणी नाही, शौचालये नाहीत. अशा परिस्थितीत कर्मचारी काम करत आहेत. शासकीय सेवेत असल्याने त्यांना तक्रारी करण्याची मुभा नाही. यामुळे मुग गिळून गप्प बसून आपले कर्तव्य बजावत आहेत. या कर्मचाºयांना सुविधा मिळण्यासाठी प्रशासन कोणतीही तसदी घेताना दिसत नाही.

वसई रेल्वे पोलिसांच्या अधिपत्याखाली मीरा रोड ते वैतरणा अशी ७ रेल्वे स्थानके येतात. यात मीरा रोड, वसई, भाईंदर, नालासोपारा आणि विरार ही सर्वाधिक गर्दीची ठिकाणे आहेत. यामुळे या ठिकाणी पोलिसांना सतत पाळत ठेवावी लागत आहे. यासाठी १३७ पोलीस अधिकारी कर्मचारी काम पाहत आहेत. यात ३४ महिला कर्मचारी आहेत. केवळ भार्इंदर आणि विरार स्थानकात रेल्वे पोलिसांची अधिकृत चौकी आहेत. बाकी इतर स्थानकात चक्क पत्र्याच्या शेडमध्ये कर्मचारी बसतात, तिथेच डबे खातात, आपला गणवेश बदलतात. या ठिकाणी त्यांना नैसर्गिक विधीसाठी, स्थानकातील प्रवाशांचे शौचालये वापरावी लागतात. त्यातही त्यांना रांगेत उभे राहावे लागते. याहून दयनीय अवस्था महिला कर्मचाºयांची आहे. त्यांना गणवेश बदलण्यासाठी चेंजिंग रूम नाहीत, शौचालये नाहीत, पिण्याचे पाणी नाही. शौचालये नसल्याने आम्ही दिवसभर पाणीच पीत नसल्याचे नाव न घेण्याच्या अटीवर एका पोलिसाने सांगितले.

रेल्वे स्थानकात अनेक गुन्हे, अपघात होत असतात, यामुळे कर्मचाºयांना सदैव दक्ष राहावे लागते. सतत रेल्वे फलाटावर फेºया माराव्या लागतात. अनेक वेळा अपघातात सापडलेले मृतदेह रुग्णवाहिका येईपर्यंत ताब्यात ठेवावे लागतात. अशा वेळी चौकी नसल्याने रेल्वे स्थानकातच ठेवावे लागतात. यामुळे रेल्वे स्थानकात पोलीस चौकी असणे गरजेचे आहे. पण प्रशासन लक्ष देत नसल्याने या कर्मचाºयांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

आम्ही रेल्वेशी अनेक वेळा पत्रव्यवहार केला आहे. पण अजूनही या संदर्भात कोणतीही दखल रेल्वेने घेतलेली नाही. लवकरच याबाबत चर्चा होऊन यावर काही तोडगा निघणे गरजेचे आहे.
- यशवंत निकम,
वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वसई रेल्वे

दुसºयाची सुरक्षा करणाºया पोलिसांसाठी शौचालय किंवा चेंजिंग रूम तसेच कामानिमित्त आॅफिस नसल्याने लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे. रेल्वे प्रशासनाने प्रत्येक स्टेशनला रेल्वे पोलीस बलासाठी त्वरित स्वतंत्र कार्यालय देणे गरजेचे आहे.
- होशियार सिंह ऊर्फ राज दसोनी, सामाजिक कार्यकर्ता

Web Title: Deprived of police infrastructure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.