पालघरहून आणखी १,७३१ मजुरांची रवानगी; गाडी न मिळालेल्या प्रवाशांमध्ये संताप

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2020 01:14 AM2020-05-22T01:14:00+5:302020-05-22T01:14:21+5:30

कामगारांच्या मागणीवरून पालघर स्थानकातून गुरुवारीसुद्धा तीन विशेष गाड्या सोडण्याचे होते. मात्र जौनपूरसाठी एक गाडी सोडण्यात आली.

Departure of 1,731 more laborers from Palghar; Anger among passengers who do not get a car | पालघरहून आणखी १,७३१ मजुरांची रवानगी; गाडी न मिळालेल्या प्रवाशांमध्ये संताप

पालघरहून आणखी १,७३१ मजुरांची रवानगी; गाडी न मिळालेल्या प्रवाशांमध्ये संताप

Next

बोईसर : लॉकडाउनमुळे पालघर जिल्ह्यात अडकलेल्या आणखी १,७३१ परप्रांतीय मजुरांना गुरुवारी विशेष ट्रेनने त्यांच्या गावाकडे रवाना करण्यात आले. मात्र गुरुवारी दोन गाड्या रद्द करण्यात आल्यामुळे मजुरांच्या नाराजीचा सामना प्रशासनाला करावा लागला.
कामगारांच्या मागणीवरून पालघर स्थानकातून गुरुवारीसुद्धा तीन विशेष गाड्या सोडण्याचे होते. मात्र जौनपूरसाठी एक गाडी सोडण्यात आली. त्यातून १,७३१ मजुरांना पाठवण्यात आले. प्रतापगड आणि वदोही येथे जाणाऱ्या गाड्या रद्द करण्यात आल्याने गावी जाण्याच्या ओढीने आलेल्या प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला. गावी जाण्याच्या आशेने स्टेशनवर मोठ्या संख्येने परप्रांतीय मजूर जमले होते. मात्र त्यांच्या पदरी निराशा आली. दरम्यान, बुधवारी उत्तर प्रदेशच्या जौनपूर, वाराणसी आणि सुल्तानपूरसाठी तीन श्रमिक स्पेशल ट्रेन सोडण्यात आल्या होत्या.

Web Title: Departure of 1,731 more laborers from Palghar; Anger among passengers who do not get a car

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :palgharपालघर