CoronaVirus News: वसई विरार शहरातील कोरोना बाधितांची संख्या पोहचली 374 वर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2020 07:36 PM2020-05-20T19:36:50+5:302020-05-20T19:37:09+5:30

वसई- नालासोपारा-विरार मध्ये रूग्ण वाढताहेत ;

CoronaVirus News: The number of corona victims in Vasai Virar city reached 374 mac | CoronaVirus News: वसई विरार शहरातील कोरोना बाधितांची संख्या पोहचली 374 वर

CoronaVirus News: वसई विरार शहरातील कोरोना बाधितांची संख्या पोहचली 374 वर

Next

- आशिष राणे

वसई: विरार शहर महापालिका हद्दीत बुधवारी वसई विरार शहर महापालिका हद्दीत पुन्हा सर्वाधिक असे 19 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असून दिलासादायक बाब पालिका हद्दीतील 9 रूग्ण मुक्त देखील झाले आहेत.
तर धक्कादायक म्हणजे वसई विरार मध्ये वाढती आकडेवारी शहराची चिंता वाढवणारी असल्याची माहिती पालिकेने दिली आहे. त्यामुळे आता बुधवारी आढळून आलेल्या एकूण कोरोना बाधितांची संख्या आता थेट 374 वर पोहचली आहे.

पालिकेने दिलेल्या माहितीनुसार,बुधवारी आढळून आलेल्या रुग्णामध्ये एकूण 16 पुरुष तर 3 महिलाचा समावेश आहे.यात खास म्हणजे नालासोपारा भागातील सर्वाधिक असे 8 पुरुष रुग्णाचा समावेश आहे,तर विरार मधील 4 पुरुष व 1 महिला देखील आहे,तर वसई मध्ये ही आकडा वाढत असून यात 4 पुरुष व 2 महिलांचा समावेश आहे.

या सर्व रुग्णावर वसई ,नालासोपारा व मुंबईत विविध रुग्णालयात उपचार सुरु असून वसई विरार हद्दीत बाधित रुग्णाची एकूण संख्या  374 वर पोहचली असून यात पालिका हद्दीत एकूण 15 जण मयत झाले आहेत.

वसई विरार हद्दीतील 9 जण कोरोना मुक्त 

तर वसई विरार पालिका हद्दीत बुधवारी वसईतून 1 विरार पूर्व पश्चिम 5 आणि नालासोपारा मधून 3 असे एकूण 9 जण कोरोना मुक्त झाले असल्याने ही बाब दिलासादायक ठरली आहे. त्यामुळे आता कोरोनाची  एकूण मुक्त संख्या ही 209 वर गेली आहे,तर आजवर 150 बाधित रुग्णावर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.      

दिनांक: 20 मे 2020 कोरोना- रुग्णांची आकडेवारी

वसई-2 महिला ,4 पुरुष
नालासोपारा -8 पुरुष 
विरार -4 पुरुष  1 महिला
एकूण रुग्ण संख्या  -19
वसई-विरार शहरातील एकूण रुग्ण संख्या -374
कोरोना मुक्त संख्या :- 209
कोरोना ग्रस्त मयत संख्या :- 15
उपचार घेत असलेली रुग्ण संख्या :-150

Web Title: CoronaVirus News: The number of corona victims in Vasai Virar city reached 374 mac

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.