रेल्वे फलाटाच्या गॅपमध्ये चिमुकल्याचा पाय सटकला अन्...; वसई रोड स्थानकातील थरारक प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2021 03:19 PM2021-07-22T15:19:54+5:302021-07-22T15:25:28+5:30

चिमुकल्याला बाहेर काढले व  थेट धावत नजीकच्या रुग्णालयात त्या मुलाला दाखल केल्यानं  त्या मुलाचे प्राण बचावले आहेत.

Chimukalya's foot slipped in the gap of the railway platform and ...; Vibrating type at Vasai Road station | रेल्वे फलाटाच्या गॅपमध्ये चिमुकल्याचा पाय सटकला अन्...; वसई रोड स्थानकातील थरारक प्रकार

रेल्वे फलाटाच्या गॅपमध्ये चिमुकल्याचा पाय सटकला अन्...; वसई रोड स्थानकातील थरारक प्रकार

googlenewsNext

वसई: वसई रोड रेल्वे स्थानकात लोकल फलाटावर लागतानाच गाडीतुन उतरताना एका चिमुकल्याचा पाय सटकला आणि तो थेट लोकल व फलाटाच्या गॅप मधून  ट्रॅकवर पडून गंभीर जखमी झाल्याची चित्तथरारक  घटना मंगळवारी सकाळी घडल्याचे उघडकीस आले आहे. मात्र म्हणतात ना देव तारी त्याला कोण मारी या युक्तीनुसार त्याचवेळी  घटनास्थळी नकळत  ड्युटीवर असलेल्या एका  रेल्वे पोलिस शिपायाने धावत जाऊन त्या फलाट व  गॅप मधून खाली उतरत त्या चिमुकल्याला बाहेर काढले व  थेट धावत नजीकच्या रुग्णालयात त्या मुलाला दाखल केल्यानं  त्या मुलाचे प्राण बचावले आहेत.

चित्तथरारक अश्या या रेल्वे अपघातात कु.मलेशी एलगी वय 10 वर्षे रा. उत्तन राई मुरदा गाव झोपडपट्टी भाईंदर हा गंभीर रित्या जखमी झाला असून त्यास डोके व ओठांनावर उपचार सुरू आहेत मात्र तो सुखरूप आहे असे पोलिसांनी सांगितले तर वेळीच प्रसंगावधान दाखवणारे रेल्वे पोलीस आदिनाथ ठाणाबिर यांचे आता सर्वत्र कौतुक होत आहे.

मलेशीची आई मरिअम्मा चा रेल्वे पोलिसांना सलाम-

क्षणाचाही विलंब न करता रेल्वे पोलीस शिपाई ठाणावीर यांनी प्रवाशांच्या मदतीने मलेशीला लोकल डबा व त्या फलाटाच्या गॅपमधून ट्रॅकवर उतरून तात्काळ वर काढत धावतच स्टेशन जवळील हॉस्पिटल गाठले आणि वेळेत उपचार मिळाल्यामुळे मलेशियाचे प्राण तर वाचले त्यानंतर पोलिसांनी त्याच्या घरचा पत्ता शोधून आई-वडिलांना अपघाताची माहिती दिली, असता मल्लेशीची आई मरियम हिने वसई गाठत पोलिसांच्या पायावरच येऊन कोसळली आणि माझ्या मुलाला वाचवले तुमच्या रूपाने देवच धावला अशी कृतज्ञता व्यक्त करून तिने पोलिसांना सलाम केला.

वसईत भाजीपाला विक्री करणाऱ्या आईला शोधण्यासाठी निघाला होता मलेशी-

मलेशी देवबाप्पा एलगी हा 10 वर्षाचा मुलगा भाईंदर पश्चिम येथील राई मुरदा स्थित एका झोपडपट्टीत राहतो आपली आई वसईत भाजी विकते आणि तिच्या शोधात मलेशीने भाईंदर वरून  मंगळवारी सकाळी लोकल पकडली व तो वसईच्या दिशेने निघाला असता वसई रोड स्टेशनवर गाडी येताच प्लॅटफॉर्मवर उतरताना मलेशि चा अंदाज चुकला व तो फलाट व  लोकलच्या गॅप मधून थेट ट्रॅक वर  कोसळला लागलीच प्रवाश्यानी चेन ओढून आधी गाडी  थांबवली असता ड्युटीवर असलेले पोलीस शिपाई आदिनाथ ठाणावीर यांनी लागलीच धाव घेतल्यानं पुढील मोठा अनर्थ टळला व त्या चिमुकल्याला तात्काळ बाहेर काढून त्यास जीवदान दिले.

Web Title: Chimukalya's foot slipped in the gap of the railway platform and ...; Vibrating type at Vasai Road station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.