परकीय नागरिकांविराेधात धडक माेहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 02:07 AM2021-03-06T02:07:22+5:302021-03-06T02:07:36+5:30

चार दुकाने, एका सदनिकेवर हाताेडा : पाेलीस, महापालिकेची संयुक्त कारवाई

Campaign against foreign nationals | परकीय नागरिकांविराेधात धडक माेहीम

परकीय नागरिकांविराेधात धडक माेहीम

Next

 

लोकमत न्यूज नेटवर्क 
नालासोपारा : पूर्वेतील परिसरात राहणाऱ्या नायजेरियन आणि परकीय नागरिकांच्या बेकायदा व्यवसाय ठिकाणांवर महापालिका आणि तुळिंज पाेलिसांनी शुक्रवार सकाळपासून  संयुक्त कारवाईला सुरुवात केली. या कारवाईत चार बेकायदा दुकाने व एक सदनिका हातोड्याच्या साह्याने तोडण्यात आली आहेत.
तुळिंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनेक जण बेकायदा वास्तव्य करत असून घरमालकांना नोटीस देण्याचेही पोलिसांनी सुरू केले आहे. १७ इमारतींत नायजेरियन लोक बेकायदा राहत व व्यवसाय करत असल्याचे पोलिसांनी सांगितले. या ठिकाणांवर कारवाई करण्यासाठी संबंधित प्रभागाला १८ आणि १९ जानेवारीला तुळिंज पोलिसांनी पत्रव्यवहार केला. शुक्रवारी सकाळी महापालिकेचा  ‘ब’ प्रभाग आणि तुळिंज पोलिसांनी संयुक्त कारवाईला सुरुवात केली. 
नालासाेपारा पूर्वेतील  प्रगतीनगरमधील वेदांत अपार्टमेंटमधील चार बेकायदा दुकाने हातोडीच्या साहायाने तोडली. या चार दुकानांत नायजेरियनने हॉटेल, सलून सुरू केले होते. तसेच बसेरा गार्डन अपार्टमेंटमधील एका बेकायदा खाेलीत ते राहत असल्याने त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. नायजेरियन १३, युगांडा ४, अमेरिका २, फिलिपाइन्स ५, पाकिस्तान १, जॉर्जिया १, यूएई २, श्रीलंका २, दक्षिण कोरिया १ असे एकूण ३१ परदेशी 
नागरिक नालासाेपारात बेकायदा राहत आहेत.

पेल्हार येथील सुमारे २० हजार चाैरस फुटांचे ताेडले बेकायदा बांधकाम  
nमहापालिका आयुक्त डी. गंगाधरन आणि अतिरिक्त आयुक्त आशीष पाटील यांच्या आदेशानुसार शुक्रवारी सकाळी सीयूसी पथकाचे सहायक आयुक्त प्रेमसिंग जाधव यांनी ही कारवाई केली.
बेकायदा परकीय नागरिक राहणाऱ्या जागेवर, व्यवसाय करणाऱ्या ठिकाणांवर कारवाईला सुरुवात झाली आहे. अशा इमारतींची नावे व यादी पालिकेला दिली आहेत. ही कारवाई अशीच सुरू राहणार आहे.
- राजेंद्र कांबळे, पोलीस निरीक्षक, तुळिंज पोलीस ठाणे
तुळिंज पोलिसांकडून  पत्रव्यवहार झाला आहे. प्रभाग सहायक आयुक्तांना कारवाईचे आदेश दिले आहेत. शुक्रवारपासून या कारवाईला सुरुवात केली आहे.
- आशिष पाटील, अतिरिक्त आयुक्त, वसई-विरार शहर महापालिका

Web Title: Campaign against foreign nationals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.