वसईतील बसीन कॅथॉलिक बँकेच्या मुख्य महाव्यवस्थापकावर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 05:41 AM2019-11-13T05:41:11+5:302019-11-13T05:41:15+5:30

कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी वसईतील बसीन कॅथलिक बँकेचे मुख्य महाव्यवस्थापक आणि आणखी एकाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Basin Catholic Bank's general manager in Vasai lodged a complaint | वसईतील बसीन कॅथॉलिक बँकेच्या मुख्य महाव्यवस्थापकावर गुन्हा दाखल

वसईतील बसीन कॅथॉलिक बँकेच्या मुख्य महाव्यवस्थापकावर गुन्हा दाखल

Next

वसई/नालासोपारा : भाईंदर येथील एका ५३ वर्षीय मच्छीमार व्यावसायिकाच्या व्यवसायात भागीदारी करून गुंतवणूक करतो असे आश्वासन देऊन त्याची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी वसईतील बसीन कॅथलिक बँकेचे मुख्य महाव्यवस्थापक आणि आणखी एकाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. फसवणूक झालेल्याने वसई पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दिल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, भार्इंदर येथील उत्तन लाईट हाऊस रोडवर राहणारे आणि मच्छी खरेदी - विक्र ीचा व्यवसाय करणारे मुनीर अब्दुल रेहमान शेख (५३) यांच्या व्यवसायात भागीदारी करण्याचे आश्वासन बॅसिन कॅथॉलिक बँकेच्या मुख्य कार्यालयातील जनरल मॅनेजर अग्नेलो जोसेफ पेन आणि सचिन पांडुरंग पागधरे यांनी २०१६ ते २०१८ या काळात दिले.
प्रत्यक्षात मात्र, आपापसात संगनमत करून या दोघांनी मुनीर यांची फसवणूक केली. चिश्तीया फिशरीजमध्ये भागीदारी घेऊन मुनीर यांच्या मच्छी व्यवसायाच्या विक्रीतून आलेली रक्कम तसेच मच्छीमार व्यावसायिकांकडून खरेदी केलेल्या मच्छीसाठी देणे असलेली रक्कम आणि आयसीआयसीआय बँकेत कर्ज घेण्यासाठी रजिस्ट्रेशन आणि स्टॅम्प ड्युटीसाठी भरण्यासाठी दिलेली रक्कम यांसह मुनीर यांची जमीन विकून आलेली रक्कम अशा एकूण ४ कोटी १० लाख १९ हजार ९०९ रुपयांचा बनावट पत्राच्या आधारे या दोघांनी अपहार केला. तसेच या फसवणुकीबाबतची तक्रार केलीस, तर बघून घेईन अशी धमकी देखील मुनीर यांना देण्यात आली होती.
दरम्यान, कॅथॉलिक बँकेच्या तज्ज्ञ संचालकांनी या कर्ज प्रकरणात व्यापक संदिग्धता असल्याचा अहवाल यापूर्वीच अध्यक्षासहित संचालक मंडळाला सादर केला होता. परिणामी, या सर्व प्रकरणात साठेमारी म्हणून बँकेचे अध्यक्ष रायन फर्नांडिस यांनी कोणाच्याही दबावाला बळी न पडता या महाकर्ज प्रकरणाचे तटस्थ विशेष लेखापरीक्षण करून घेतले जाईल अशी भूमिका घेतली होती.
मात्र, या लेखापरीक्षणाचे सोपस्कार सुरू असतानाच आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या प्रकरणात सकृतदर्शनी गुन्हा घडल्याचे दिसत असल्याचे सांगत बँकेचे मुख्य महाव्यवस्थापक तसेच इतरांविरूद्ध गुन्हा दाखल केला.तसेच पोलिसांचा अधित तपास सुरू आहे.
गुन्हा दाखल झाल्यानंतर बँकेचे अध्यक्ष तसेच मुख्य प्रशासकीय अधिकारी किंवा स्वत: अ‍ॅग्नेलो पेन यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.
>तक्रारदार हे थकबाकीदार
या प्रकरणी पोलिसांनी निष्पक्ष चौकशी अथवा लेखापरीक्षकांचा योग्य अहवाल न पाहता गुन्हे दाखल केले आहेत, ते चुकीचे आहेत. यातील तक्र ारदार हे बँकेचे थकबाकीदार आहेत. त्यामुळे नक्कीच या चुकीच्या गुन्ह्यांमुळे सहकारातील अग्रगण्य नाव असलेल्या बँकेच्या नावाची बदनामी झाली आहे. बँक प्रशासन सर्व कायदेशीर बाबी तपासून या प्रकरणी बाजू मांडेल.
-डॉमनिक डिमेलो, माजी अध्यक्ष तथा जेष्ठ संचालक,
बिसन कॅथॉलिक बँक, पापडी मुख्यालय

Web Title: Basin Catholic Bank's general manager in Vasai lodged a complaint

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.