मतविभागणीचा फायदा पुन्हा एकदा बविआला; मतदार, मतदान वाढले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2019 11:14 PM2019-10-27T23:14:06+5:302019-10-27T23:14:45+5:30

विजयी उमेदवाराचे मताधिक्य मात्र घटले

The advantage of division is once again; Voters, turnout increased | मतविभागणीचा फायदा पुन्हा एकदा बविआला; मतदार, मतदान वाढले

मतविभागणीचा फायदा पुन्हा एकदा बविआला; मतदार, मतदान वाढले

Next

पंकज राऊत

बोईसर : पालघर तसेच डहाणू विधानसभा मतदारसंघाची विभागणी करून २००९ मध्ये बोईसर विधानसभा मतदारसंघ निर्माण करण्यात आला. हा मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी आरक्षित ठेवला आहे. २००९, २०१४ आणि २०१९ या तीनही निवडणुकांमध्ये बहुजन विकास आघाडीच्या उमेदवाराला मतविभागणीचा फायदा होऊन सलग तिसऱ्यांदा विजय मिळवला आला. मात्र, बविआला विजय मिळत असला तरी प्रत्येक निवडणुकीत त्यांचे मताधिक्य घटत आहे. शिवसेना, बहुजन विकास आघाडी आणि अपक्ष (भाजप बंडखोर) यांच्यात झालेल्या अटीतटीच्या लढतीत बविआचे उमेदवार राजेश पाटील यांचा २७५२ मताधिक्याने विजय झाला आहे.

प्रचारातील मुद्दे, आरोप - प्रत्यारोप गाजले
या निवडणुकीच्या प्रचारात नेहमीप्रमाणेच विकासकामांची गाजरे दाखवण्यात आली. विशेष म्हणजे या निवडणुकीत शिवसेना, बविआ आणि अपक्ष उमेदवारांमध्ये काँटे की टक्कर झाली. सेनेचे उमेदवार गेल्या दहा वर्षांत केलेल्या कामांचा तसेच एमएमआर क्षेत्र पालघर तालुक्यापर्यंत विस्तारित करण्यासाठी आणि महत्त्वाच्या रस्त्यांसाठी पाठपुरावा केल्याचे सांगत होते तर उर्वरित दोन प्रमुख उमेदवार तरेंनी दहा वर्षात काय विकासकामे केली हे सांगण्यासोबतच त्यांनी मतदारसंघात जनसंपर्क ठेवला नाही, असा आरोप करून आम्ही सर्व भागांमधील घटकांना योग्य न्याय देऊन विकासकामे करू आणि नागरिकांसाठी नेहमी उपलब्ध राहू असे आश्वासन देत होते.

ठाकरेंच्या सभेचा फायदा झाला नाही ?
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनोर तसेच नालासोपारा येथे बोईसर, पालघर, नालासोपारा आणि वसईच्या सेनेच्या उमेदवारांसाठी प्रचारसभा घेतल्या. मात्र यापैकी केवळ पालघरचेच उमेदवार निवडून आले. उर्वरित तीनही उमेदवारांना पराभव स्वीकारावा लागला.

या निवडणुकीतील विजयी उमेदवारांची मते आणि मताधिक्य
२००९ मध्ये बविआचे विलास तरे ५३,७२७ मते मिळवून १३, ०७८ मताधिक्याने विजयी झाले.
२०१४ मध्ये पुन्हा विलास तरे ६४, ५५० मते मिळवून १२, ८७३ मताधिक्याने निवडून आले.
तर २०१९ च्या निवडणुकीत बविआचे राजेश पाटील यांनी ७८, ७०३ मते मिळवून २७५२ मताधिक्याने निवडून आले. म्हणजेच विजयी उमेदवारांचे मताधिक्य प्रत्येक वर्षी कमी होत आहे. विशेष बाब म्हणजे या तीनही निवडणुकांमध्ये बविआच्या उमेदवाराला मतविभागणीचा फायदा झाला आहे.

Web Title: The advantage of division is once again; Voters, turnout increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.