अतिरिक्त बांधकाम ताेडण्यासाठी ३० दिवसांची मुदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 12:01 AM2021-03-05T00:01:46+5:302021-03-05T00:01:53+5:30

रिलायन्स माॅल इमारतमालकाला डहाणू नगर परिषदेची नाेटीस : तत्काळ वापर थांबविण्याचे आदेश

30 days for additional construction | अतिरिक्त बांधकाम ताेडण्यासाठी ३० दिवसांची मुदत

अतिरिक्त बांधकाम ताेडण्यासाठी ३० दिवसांची मुदत

Next

 

लोकमत न्यूज नेटवर्क 
डहाणू :  डहाणू शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या रिलायन्स मॉल इमारतीत अतिरिक्त वाढीव बांधकाम केल्याचे निष्पन्न झाल्याने नगर परिषदेने नोटीस बजावली आहे. या मॉलचे अतिरिक्त बांधकाम ३० दिवसांत तोडण्याचे व बेकायदा वापर बंद करण्याचे आदेश मॉलच्या इमारतमालकाला दिले आहेत.  यामुळे शहरातील बेकायदा बांधकामे करणाऱ्यांना धडकी भरली आहे. 
गेल्या वर्षी रिलायन्स मॉल सुरू झाला. तालुक्यातील हा पहिलाच वातानुकूलित मॉल आहे. दररोज हजारो ग्राहक येथे विविध वस्तू खरेदी करण्यासाठी गर्दी करतात. मात्र, या मॉलचे बांधकाम बेकायदा आढळले आहे. मॉलची अतिरिक्त उंची साडेचार मीटर आढळून आल्याने हे बांधकाम ३० दिवसांत तोडण्याचे आदेश डहाणूचे मुख्याधिकारी तथा प्रयोजन अधिकारी यांनी दिले आहेत. 
डहाणू नगर परिषदेकडून या मॉलचे बांधकाम करताना सुधारित परवानगी ६३११चे उल्लंघन केले आहे. नगर परिषदेने पूर्वी दिलेली नोटीस रद्द केली आहे. महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ व महाराष्ट्र नगर परिषद अधिनियम व १९६५ अन्वये मुख्याधिकारी यांना प्रदान केलेल्या अधिकारांनुसार बेकायदा बांधकामांवर ही कारवाई करण्यात आली. याबाबत कसूर झाल्यास खटला दाखल करण्याचे आदेश नोटिशीद्वारे देण्यात आले आहेत. दरम्यान, डहाणू नगर परिषद हद्दीत अनेक बेकायदा बांधकामे झाली आहेत. सीआरझेड कायद्याचे उल्लंघन होत आहे. साहाय्यक जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी एका अहवालात १५ पैकी १२ इमारती बेकायदा असल्याचा ठपका ठेवला आहे.

आम्ही नगर परिषदेकडून कायदेशीर परवानगी घेतलेली आहे. त्यानुसारच बांधकाम केलेले असून, यासंबंधीची कागदपत्रे आमच्याकडे आहेत. 
- मिहीर शहा, मालक, 
रिलायन्स मॉल 

हे बेकायदा बांधकाम मिहीर शहा यांच्या नगराध्यक्ष कार्यकाळातील आहे. त्यांच्या २०१४ ते २०१७ या कालावधीतील विकासकामांची चौकशी करावी. गोपीपुरा जैन मंदिर येथे रेल्वे लाइनलगत असलेल्या अनियमित बांधकामाची चौकशी व्हावी. 
- भरत राजपूत, नगराध्यक्ष, डहाणू

Web Title: 30 days for additional construction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.