भाताच्या कोठाराला ४० कोटींचा फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2019 12:12 AM2019-11-15T00:12:00+5:302019-11-15T00:12:06+5:30

वादळसदृशस्थितीमुळे सुमारे ३५ ते ४० कोटी रुपयांच्या पिकांचे नुकसान झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने शासनाला कळवली आहे.

3 crores hit rice paddy | भाताच्या कोठाराला ४० कोटींचा फटका

भाताच्या कोठाराला ४० कोटींचा फटका

Next

हितेन नाईक/अनिरुद्ध पाटील ।
पालघर/बोर्डी : जिल्ह्यातील आठ तालुक्यात खरीप हंगामात भात हे प्रमुख पीक घेतले जात असून परतीचा पाऊस आणि वादळसदृशस्थितीमुळे सुमारे ३५ ते ४० कोटी रुपयांच्या पिकांचे नुकसान झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने शासनाला कळवली आहे. दरम्यान, राज्य शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिल्यानंतर तालुकानिहाय पंचनाम्याचे काम ९९ टक्के पूर्णत्वास आले असून जिल्ह्यातील एकूण ५० हजार हेक्टर बाधित क्षेत्रावरील १ लाख शेतकरी प्रभावित झाले आहेत.
जिल्ह्याच्या आठ तालुक्यात खरीप हंगामात भात हे प्रमुख पीक असून १ लाख ५ हजार १६५.७४ हेक्टर हे एकूण लागवडीचे क्षेत्र आहे. त्यानुसार पालघर तालुक्यात १४८२६.८० हेक्टर, वसई ८४५३.२० हे., डहाणू १४,४७३.८० हे., तलासरी ९७५८.९१ हे., विक्रमगड ९४४८.१३ हे., जव्हार २०८५८.१० हे., मोखाडा १३३०२.८० हे. आणि वाडा १४०४४ हे. क्षेत्रावर हळवे, गरवे व निमगरवे या प्रकारातील विविध जातीच्या वाणांची लागवड केली जाते. खरीप हंगामाच्या प्रारंभापासून पावसाने समाधानकारक हजेरी लावल्याने भाताची रोपे तयार करायला चांगला अवधी मिळून त्याची जोमाने वाढ झाली होती. रोपणी करिताही चांगला पाऊस झाल्याने पेरणीची कामे योग्य अवधीत आटोपली होती. त्यामुळे या हंगामात मुबलक पीक येण्याची आशा शेतकऱ्यांनी वर्तवली होती. त्यानुसार लोंबी येण्याच्या काळात खोडकिडा, लष्करी आळीचा प्रादुर्भाव वगळता त्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र जसा-जसा कणसात दाणा भरत होता, तस-तसे पावसाचे प्रमाण कमी होणे आवश्यक असताना उलट अवकाळी पावसाने घातलेला धुमाकूळ त्यातच ‘क्यार’ आणि ‘महा’वादळाचा तडाखा अशा तिहेरी संकटात शेतकरी सापडला होता. आणि हवामान विभागाकडून प्राप्त अंदाजानुसार हा कालावधी वाढत गेला. हळवे भात पीक कापणीला आले होते, मात्र शेतात ढोपरभर पाणी असल्याने शेतकरी चिंतेत होता. हळूहळू करता गरवे आणि निमगरवे पिकही कापणीला आल्याने शेतकºयांनी हळव्या पिकाच्या कापणीला हात घातला. मात्र परतीच्या पावसाने झोडपल्याने शिवारात कापून ठेवलेले आणि साचलेल्या पाण्यात तरंगणारे पीक उचलण्याची नामुष्की बळीराजावर ओढवली. २३ आॅक्टोबर पासून चक्रीवादळाचा प्रभाव वाढून निर्माण झालेल्या वादळसदृश परिस्थितीमुळे पावसासह जोराचे वारे वाहिल्याने पिकलेले गरवे आणि निमगरवे भात पाणी साचलेल्या खाचरातच आडवे झाले. ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर कापलेले पीक हाती मिळेल या आशेवर असलेल्या शेतकºयांना त्या जागेवर पसरविण्याचे कष्ट घ्यावे लागले. मात्र दाणा भिजल्याने त्याला अंकुर फुटले. शिवाय बुरशी लागण्यापासून पेंड वाचविण्यासाठी घरासमोर ऐन दिवाळीत ताडपत्रीवर ओले भात पसरविण्याची वेळ शेतकºयांवर आली. शासनाने भात पिकांच्या नुकसानीची पाहणी करून पंचनामा करण्याचे आदेश दिले. त्यानुसार तालुकानिहाय पंचनामा करण्यासाठी महसूल, कृषी आणि जिल्हा परिषद कर्मचाºयांनी नुकसान झाल्याच्या नोंदी गोळा करून जिल्ह्याला पाठविल्या.
।पालघर तालुक्यात १० हजार १८७.७ हेक्टर बाधित क्षेत्र असून २२ हजार ५८४ शेतकरी संख्या आहे. वसई तालुक्यात ३ हजार ६१७.५ हेक्टर आणि ६ हजार ४७१ शेतकरी, डहाणू तालुक्यात ९ हजार ६०६.८
हे. आणि
20,319

शेतकरी, तलासरी तालुक्यात ४ हजार २७१.३ हे. तसेच ७ हजार ८५० शेतकरी, विक्रमगड तालुक्यात ५ हजार ७८४.६ हे. त्याचप्रमाणे १२ हजार १७७ शेतकरी, जव्हार तालुक्यात २ हजार ५८०.१ हे. तर ११ हजार ३३० शेतकरी आणि वाडा तालुक्यात ९ हजार ९३९.२ हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून २१ हजार ३१२ शेतकºयांचा समावेश आहे.
>काढणी पश्चात आणि उभ्या पिकाच्या झालेल्या नुकसानीच्या नोंदी करण्यात आल्या आहेत. या पद्धतीने जिल्ह्यातील पिकाखालील एकूण १ लाख ५१६५.७४ हेक्टर क्षेत्रापैकी १३ नोव्हेंबरपर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार
50,173.2
हेक्टर क्षेत्र बाधित झालेले असून १ लाख १४ हजार ९६२ शेतकरी नुकसानीला बळी पडले आहेत.
>पीक विम्याचा लाभ घेतलेले कर्जदार आणि बिगरकर्जदार शेतकºयांची तालुकानिहाय संख्या
पालघर : ३७५३ शेतकरी (२३५८.७३ हेक्टर)
वसई : ५१४ शेतकरी ३४५.२७ हेक्टर
डहाणू : ३२०१ शेतकरी १५९१.८५ हे.
तलासरी : १२७४ शेतकरी ४७८.३५ हे.
विक्रमगड : २६२७ शेतकरी १५५१.५२ हे.
जव्हार : ३८५६ शेतकरी ११८२.९७ हे.
मोखाडा : १६३६ शेतकरी ५७०.७५ हे.
वाडा : ५७७७ शेतकरी ४८०९.३२ हे.

Web Title: 3 crores hit rice paddy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.