वाघाच्या हल्ल्यात तरुण शेतकरी ठार; कुटुंबावर दु:खाचा डोंगर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2022 01:39 PM2022-03-09T13:39:44+5:302022-03-09T14:38:25+5:30

बकऱ्यांसाठी चारा आणण्याकरिता शेतात गेलेल्या शेतकऱ्यावर वाघाने हल्ला चढवला व दूरपर्यंत फरफटत नेले.

Young farmer killed in a tiger attack in vardha | वाघाच्या हल्ल्यात तरुण शेतकरी ठार; कुटुंबावर दु:खाचा डोंगर

वाघाच्या हल्ल्यात तरुण शेतकरी ठार; कुटुंबावर दु:खाचा डोंगर

googlenewsNext

कारंजा (घाडगे) ( वर्धा) : शेतात बकऱ्यांसाठी चारा आणण्यास गेलेल्या शेतकऱ्याला वाघाने हल्ला चढवून ठार केले. ही घटना आज (दि. ९) दुपारी १२ च्या सुमारास कारंजा घाडगे तालुक्यातील कन्नमवार ग्राम येथे घडली. 

लक्ष्मण महादेव हुके(३५) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. हा शेतकरी बकऱ्यांकरिता चारा आणण्यासाठी गावानजीकच्या तलाव रस्त्यावर असलेल्या शेतात गेला होता. शेतामधील गव्हाच्या पिकात असलेला हिरवा चारा कापत असताना अचानक दबा धरून बसलेल्या वाघाने त्याच्यावर हल्ला केला व त्याला दूरपर्यंत ओढत नेले. यावेळी शेतकऱ्याच्या ओरडण्याचा आवाज ऐकून आजूबाजूचे शेतकरी धावले असता वाघ पळून गेला. परंतु तोपर्यंत लक्ष्मणचा मृत्यू झाला होता. लक्ष्मणला म्हातारे आई-वडील पत्नी दोन मुले असून त्याच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबावर फार मोठं संकट कोसळलं आहे.

Web Title: Young farmer killed in a tiger attack in vardha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.