वर्धा लोकसभा निवडणूक निकाल २०१९; रामदास तडस यांचा दणदणीत विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2019 10:05 PM2019-05-23T22:05:02+5:302019-05-23T22:09:52+5:30

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत कॉँग्रेसच्या दिग्गज उमेदवाराचा पराभव करून भाजप-शिवसेना युतीच्या तिकिटावर विजय मिळविणारे रामदास तडस यांनी पुन्हा २०१९ मध्ये वर्धा लोकसभा मतदारसंघातून विजय संपादन केला आहे.

Wardha Lok Sabha election result 2019; Victory of Ramdas Tadas | वर्धा लोकसभा निवडणूक निकाल २०१९; रामदास तडस यांचा दणदणीत विजय

वर्धा लोकसभा निवडणूक निकाल २०१९; रामदास तडस यांचा दणदणीत विजय

googlenewsNext
ठळक मुद्देसर्वच विधानसभा मतदार संघात राहिला भाजपचा बोलबालातडस यांच्या व्यक्तिगत जनसंपर्काला मतदारांची पसंतीगटबाजी व गुडगावचा उमेदवार हेच कॉँग्रेसच्या पराभवाचे मुख्य कारण


लोकमत न्यूज नेटवर्क ।

वर्धा : २

०१४ च्या लोकसभा निवडणुकीत कॉँग्रेसच्या दिग्गज उमेदवाराचा पराभव करून भाजप-शिवसेना युतीच्या तिकिटावर विजय मिळविणारे रामदास तडस यांनी पुन्हा २०१९ मध्ये वर्धा लोकसभा मतदारसंघातून विजय संपादन केला आहे. पाच वर्षांनंतरही या लोकसभा मतदारसंघात मोदी लाट कायम राहिल्याचे चित्र या निकालाने स्पष्ट झाले आहे. मागील पाच वर्षांत रामदास तडस यांनी मतदारांशी व्यक्तिगतस्तरावर ठेवलेला जनसंपर्क, भारतीय जनता पक्षपातळीवरील संघटनेची बांधणी व कार्यकर्त्यांनी घेतलेले परिश्रम, तेवढीच शिवसेनेने ऐनवेळी समर्थपणे दिलेली साथ हेच भाजपच्या विजयाचे मुख्य कारण ठरले.
वर्धा : स्थानिक भारतीय खाद्य निगमच्या गोदाम परिसरात सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरूवात झाली. पहिल्या फेरीची मतमोजणी सुरू झाल्यापासून भाजपा उमेदवार विद्यमान खासदार रामदास तडस आघाडी घेऊन होते. पहिल्या फेरीत ७ हजार ८९६ मतांची आघाडी मिळाली.
मतमोजणीच्या प्रत्येक फेरीत सहाही विधानसभा क्षेत्राची मतमोजणी करण्यात येत होती. याच मतमोजणीसोबत पोस्टल बॅलेटचीही मोजणी करण्यात आली. पहिल्या फेरीपासून काँग्रेसच्या उमेदवार अ‍ॅड. चारूलता टोकस यांच्यावर तडस यांनी आघाडी मिळाली. पहिल्या फेरीत तडस यांना २३ हजार १५ मते मिळाली. तर चारूलता टोकस यांना १५ हजार १९९ मते मिळाली. वंचित बहुजन आघाडीचे अ‍ॅड. धनराज वंजारी यांना १ हजार १७६ तर बसपाचे शैलेश अग्रवाल यांना १ हजार ११६ मते मिळाली. दुसऱ्या फेरीतही तडस यांना ४३ हजार ५४८ तर टोकस यांना ३२ हजार ८०२ मते मिळाली. मतमोजणीच्या प्रत्येक फेरीतच तडस काँग्रेस उमेदवार टोकस यांच्यावर आघाडी घेत राहिले. त्यामुळे तडस यांच्या मताधिक्यात वाढ झाल्याचे दिसून येत होते. मतमोजणीच्या स्थळावर १४ टेबल लावण्यात आले होते. मतमोजणीच्या २७ फेºया करण्यात आल्या. काही टेबलवर अतिशय वेगाने काम आटोपण्यात येत होते. त्यामुळे तेथील मतमोजणीचे आकडे लगेच बाहेर पडत होते. मतमोजणीच्या १० फेºया आटोपल्यानंतर भाजप उमेदवार रामदास तडस दुपारी ४.२५ मिनिटांनी मतमोजणीस्थळी पोहोचले. येथे पत्रकारांशी संवाद साधला. त्यांच्या व्यतिरिक्त वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अ‍ॅड. धनराज वंजारी हेसुद्धा मतमोजणीस्थळी उपस्थित होते. भाजपाला वर्धा लोकसभा मतदार संघात मिळालेल्या ऐतिहासिक विजयानंतर शहरातील शिवाजी चौकातून मिरवणूक काढण्यात आली. यात भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांसह शिवसेना व मित्र पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी विजयाचा जल्लोष साजरा केला. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सरकार विराजमान होणार, असे दिसताच जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडले.

या निकालाचा ऐतिहासिक संदर्भ
वर्धा लोकसभा मतदारसंघात १९५१ पासून सलग निवडणुका जिंकणाऱ्यांमध्ये कमलनयन बजाज, वसंत साठे यांचा समावेश आहे. आता २०१९ मध्ये सलग दुसºयांदा विजय मिळविणारे रामदास तडस यांचे नाव जोडल्या गेले आहे. कमलनयन बजाज यांनी १९५७, १९६२ व १९६७ मध्ये लोकसभेच्या निवडणुका जिंकल्या तर माजी केंद्रीय मंत्री दिवंगत वसंत साठे यांनी १९८०, १९८४ व १९८९ मध्ये सलग निवडणुका जिंकल्या.
त्यानंतर २०१४ मध्ये रामदास चंद्रभान तडस हे भाजपकडून निवडून आले व आता पुन्हा २०१९ मध्ये मतदारांनी त्यांना संधी दिली आहे. तसेच वर्धा लोकसभा मतदारसंघातून कॉँग्रेसच्या तिकिटावर दत्ता मेघेही दोनदा निवडून आले आहेत. मेघे यांनी १९९८ मध्ये पहिली निवडणूक जिंकली. त्यानंतर २००९ मध्ये दत्ता मेघे पुन्हा निवडून आले. मात्र, या मतदारसंघातून सलग निवडणूक जिंकणारे तडस हे तिसरे खासदार आहेत.

Web Title: Wardha Lok Sabha election result 2019; Victory of Ramdas Tadas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.