चारही डॉक्टरांविरुद्ध गुन्हे दाखल; ‘आरोग्य’च्या अहवालावर पोलिसांची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2022 08:18 AM2022-01-19T08:18:35+5:302022-01-19T08:20:11+5:30

कदम रुग्णालयात सुरू असलेला गैरप्रकार हळूहळू समोर आला. त्यामुळे झोपी गेलेला आरोग्य विभाग पुन्हा जागा झाला.

wardha illegal abortion case Charges filed against all four doctors | चारही डॉक्टरांविरुद्ध गुन्हे दाखल; ‘आरोग्य’च्या अहवालावर पोलिसांची कारवाई

चारही डॉक्टरांविरुद्ध गुन्हे दाखल; ‘आरोग्य’च्या अहवालावर पोलिसांची कारवाई

Next

- चैतन्य जोशी

वर्धा : आर्वी येथील कदम रुग्णालयात अवैध गर्भपात प्रकरणात आराेग्य विभागाकडून अहवाल प्राप्त होताच पोलिसांनी डॉ. रेखा कदम, डॉ. नीरज कदम, डॉ. कुमारसिंग कदम आणि डॉ. शैलेजा कदम यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला.  या अहवालास विलंब होत असल्याकडे ‘लोकमत’ने सातत्याने लक्ष वेधले होते.

प्रकरणाचा तपास योग्यरीत्या केला जात होता, मात्र कदम रुग्णालयात सुरू असलेला गैरप्रकार हळूहळू समोर आला. त्यामुळे झोपी गेलेला आरोग्य विभाग पुन्हा जागा झाला. अखेर ॲक्शन मोडवर येत तक्रार दिली.

कलम ४०९ (भा.दं.वि. १८६०), कलम १२ (महाराष्ट्र रुग्णपरिचर्या घरे नोंदणी कायदा),  कलम २९ (महाराष्ट्र वैद्यकीय परिषद अधिनियम, १९६५), कलम ५(२), असे अनेक कलमे लावण्यात आली. 

Web Title: wardha illegal abortion case Charges filed against all four doctors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.