वर्ध्यात कार पुलावरून कोसळली; आमदारपुत्रासह ७ विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2022 07:43 AM2022-01-25T07:43:48+5:302022-01-25T08:45:42+5:30

कार ४० फूट उंच असलेल्या पुलावरून कोसळली; ७ जणांचा जागीच मृत्यू

wardha car accident death 7 students died including son of bjp mla vijay rahangdale avishkar rahangdale | वर्ध्यात कार पुलावरून कोसळली; आमदारपुत्रासह ७ विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू

वर्ध्यात कार पुलावरून कोसळली; आमदारपुत्रासह ७ विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू

googlenewsNext

वर्धा : कारवरील नियंत्रण सुटल्यानं एक भीषण अपघात झाला आहे. यामध्ये मेडिकल कॉलेजच्या सात विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. देवळी येथून वर्ध्याला येत असताना सेलसुराजवळ कारला अपघात झाला. नियंत्रण सुटल्याने सेलसुरा जवळील नदीच्या पुलावरून कार खाली कोसळली. जवळपास 40 फूट उंच असलेल्या पुलावरून कार खाली पडल्यानं भीषण अपघात झाला. सर्व मृतक 25 ते 35 वयोगटातील असल्याची माहिती आहे. यामध्ये गोंदियातील तिरोडा गोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजयभाऊ रहांगडाले यांचा मुलगा अविष्कार रहांगडाले याचाही समावेश आहे.

अविष्कार वर्धा येथे दत्ता मेघे मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएसचा अभ्यास करत होता. रात्री वर्ध्याला परत येत असताना त्यांची कार नदीत कोसळली. या अपघातात त्याच्यासह सातही मित्रांच्या दुर्दैवी मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच वर्ध्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी पियुष जगताप, सावंगी पोलीस निरीक्षक घटनास्थळी तातडीनं दाखल झाले आहे. अपघातात दगावलेल्यांचे मृतदेह वर्धा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.

अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या इतर सहा जणांची नावं-
नीरज चौहान, प्रथमवर्ष एमबीबीएस
नितेश सिंग, 2015 इंटर्न एमबीएएस
विवेक नंदन 2018, एमबीएबीएस फायनल पार्ट1 
प्रत्युश सिंग, 2017, एमबीबीएस फायनल पार्ट 2
शुभम जयस्वाल, 2017 एमबीबीएस फायनल पार्ट 2
पवन शक्ती 2020 एमबीबीएस फायनल पार्ट 1

Web Title: wardha car accident death 7 students died including son of bjp mla vijay rahangdale avishkar rahangdale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.