वर्धा गर्भपात प्रकरण; कदम हॉस्पिटलमधील पापाचे खोदकाम; आणखी एक कवटी सापडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2022 08:49 PM2022-01-14T20:49:01+5:302022-01-14T20:51:02+5:30

Wardha News आर्वीतील गर्भपात प्रकरणात पोलिसांनी बायोगॅस खड्ड्यातून गुरुवारपर्यंत ११ मानवी कवट्या आणि ५४ हाडे जप्त केली होती. शुक्रवारी पुन्हा १ कवटी तपास पथकाच्या हाती लागली.

Wardha abortion case; The excavation of sin at Kadam Hospital; Another skull was found | वर्धा गर्भपात प्रकरण; कदम हॉस्पिटलमधील पापाचे खोदकाम; आणखी एक कवटी सापडली

वर्धा गर्भपात प्रकरण; कदम हॉस्पिटलमधील पापाचे खोदकाम; आणखी एक कवटी सापडली

googlenewsNext
ठळक मुद्देबायोगॅससह गडरचीही तपासणीवर्धा आणि नागपूरच्या तज्ज्ञांच्या चमुंकडून चौकशी

वर्धा : राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या आर्वी येथील गर्भपात प्रकरणात शुक्रवारी सकाळी ११ वाजल्यापासून नागपूर आणि वर्ध्यातील फॉरेन्सिक एक्सपर्ट तसेच आरोग्य विभागाच्या चमूने तपासणी करुन कदम हॉस्पिटलमधील पापाचे खोदकाम केले.

आर्वीतील गर्भपात प्रकरणात पोलिसांनी बायोगॅस खड्ड्यातून गुरुवारपर्यंत ११ मानवी कवट्या आणि ५४ हाडे जप्त केली होती. शुक्रवारी पुन्हा १ कवटी तपास पथकाच्या हाती लागली. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता नागपूर आणि वर्ध्यातील फॉरेन्सिक एक्सपर्ट्स तसेच आरोग्य यंत्रणेतील तज्ज्ञांसह पोलिसांनीही कदम हॉस्पिटलच्या आत व बाहेर तपासणी केली.

उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंके, ठाणेदार भानुदास पिदुरकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक वंदना सोनवणे, पाेस्को सेलच्या ज्योत्सना गिरी यांच्यासह मोठा पोलीस ताफा उपस्थित होता. खबरदारीचा उपाय म्हणून तपासणी तसेच चौकशीदरम्यान कुणालाही रुग्णालय परिसरात शिरू देण्यात आले नाही. तपास पथकाने बायोगॅसचा टॅंक तसेच गडर टॅंकही स्वच्छता कर्मचाऱ्याच्या हाताने तपासून घेतले. या तपासणीत मेडिकल बायोवेस्टसह वेगवेगळे संशयास्पद साहित्य पोलिसांच्या हाती लागले. फॉरेन्सिक पथकाने त्यातील काही नमुने ताब्यात घेतले. प्रकरणाची संवेदनशिलता लक्षात घेऊन तपास पथकातील कोणताही अधिकारी या संबंधाने बोलण्यास तयार नव्हता.

मिरगेंनी केली पाहणी...

पीसीपीएनडीटी समितीच्या राज्य सदस्य डॉ. आशा मिरगे यांनी कदम हॉस्पिटलला भेट देत रुग्णालय परिसराची पाहणी केली. यावेळी त्यांनी रुग्णालयाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

खोदकामादरम्यान सुटली दुर्गंधी

रुग्णालय परिसरात खोदकामदरम्यान चांगलीच दुर्गंधी सुटली होती. त्यामुळे या खड्ड्यात आणखी काही अवशेष सापडतात काय, हेदेखील तपासण्यात येणार आहे. सुमारे ४ वाजेपर्यंत बायोगॅस खड्ड्यांची तपासणी करण्याची प्रक्रिया सुरु होती.

याप्रकरणात अत्यंत गांभीर्याने तपास सुरु आहे. महत्त्वाचे पुरावे गोळा करायचे आहेत. त्यामुळे तूर्त काही बोलणे योग्य होणार नाही.

भानुदास पिदुरकर, पोलीस निरीक्षक, आर्वी.

Web Title: Wardha abortion case; The excavation of sin at Kadam Hospital; Another skull was found

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.