नव्या जलवाहिनीचा प्रस्ताव सात दिवसांत सादर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2019 11:43 PM2019-09-15T23:43:24+5:302019-09-15T23:44:18+5:30

देवळी येथे खासदार रामदास तडस यांच्या अध्यक्षतेखाली जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या कार्यक्रमानंतर नगर परिषदेच्या जलशुद्धीकरण व विश्राम गृहाच्या इमारतीचा श्रीगणेशा तसेच १५ कोटींच्या विकासकामांचीही पायाभरणी करण्यात आली.

Submit a new water proposal in seven days | नव्या जलवाहिनीचा प्रस्ताव सात दिवसांत सादर करा

नव्या जलवाहिनीचा प्रस्ताव सात दिवसांत सादर करा

Next
ठळक मुद्देपालकमंत्री : जनता दरबारात नागरिकांनी मांडल्या समस्या

लोकमत न्यूज नेटवर्क
देवळी : केंद्र व राज्य शासनाच्या सर्व योजना लोकांपर्यत पोहोचवाव्यात, २०२० पर्यंत या शहरातील प्रत्येक गरिबाचे स्वत:चे पक्के घर असायला पाहिजे. शासनाने जिल्ह्यातील ४५ हजार शेतकऱ्यांची कर्जमाफी केली असून शेवटच्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ होईपर्यंत ही योजना सुरू राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करीत देवळी शहरातील पिण्याच्या पाण्यासाठी टाकावयाच्या नवीन जलवाहिनीचे प्रस्ताव येत्या सात दिवसांत नगर परिषदेने शासनाकडे सादर करावे, असे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रशासनाला दिलेत.
देवळी येथे खासदार रामदास तडस यांच्या अध्यक्षतेखाली जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या कार्यक्रमानंतर नगर परिषदेच्या जलशुद्धीकरण व विश्राम गृहाच्या इमारतीचा श्रीगणेशा तसेच १५ कोटींच्या विकासकामांचीही पायाभरणी करण्यात आली. कार्यक्रमाला खासदार रामदास तडस, माजी खासदार सुरेश वाघमारे, नगर परिषद अध्यक्ष सुचिता मडावी, राजेश बकाने, गटनेत्या शोभा तडस, मिलिंद भेंडे, जिल्हा परिषद सभापती मुकेश भिसे, डॉ. शिरीष गोडे, नगर परिषद सदस्य मारोती मरगडे, गजानन टिपरे, मिलिंद ठाकरे, नंदू वैद्य, संगीता तराळे, कल्पना ढोक, सारिका लाकडे, सुनीता ताडाम, विजय गोमासे, मुख्याधिकारी अंकुश जाधव व पदाधिकारी उपस्थित होते. पंतप्रधानांनी शेतकºयांना बियाणे, खतासाठी ६ हजार रुपये दिले. आता शेतकºयांसाठी पेन्शन योजनाही आणली असून या योजनेत प्रत्येक शेतकरी कुटुंबाने सहभागी होण्याचे आवाहन पालकमंत्र्यांनी केले. यावेळी आशा सेविका ज्योत्स्ना प्रवीण राऊत यांनी आपल्या समस्यांबाबत विचार व्यक्त केले असता आशा वर्कर्सबाबत शासन लवकरच चांगला निर्णय घेणार असल्याचेही पालकमंत्र्यांनी सांगितले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते वृद्ध कलावंताचा आधार काठी देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी जनतेशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेत त्या लवकर सोडविण्याच्या सूचना केल्यात. यावेळी खासदार रामदास तडस यांनीही आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगर परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. नरेंद्र मदनकर तर संचालन पंकज चोरे यांनी केले. कार्यक्रमाला शहरासह तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Submit a new water proposal in seven days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.