वर्गखोलीत भिजून घ्यावे लागते शिक्षणाचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2019 11:26 PM2019-09-18T23:26:02+5:302019-09-18T23:26:54+5:30

येथील जुन्या वस्तीमधील जि.प. प्राथमिक कन्या शाळेची इमारत फार जुनी आहे. तीन वर्षांपूर्वी या शाळेच्या छताची दुरूस्ती करण्यात आली होती. परंतु, त्यानंतर कुठलेही दुरूस्तीचे काम करण्यासाकडे दुर्लक्षच करण्यात आले. शाळेच्या छत कवेलूचे असून सध्या अनेक कवेलू फुटले आहेत.

Soaking in the classroom requires lessons | वर्गखोलीत भिजून घ्यावे लागते शिक्षणाचे धडे

वर्गखोलीत भिजून घ्यावे लागते शिक्षणाचे धडे

Next
ठळक मुद्देपावसामुळे जि.प. शाळेला गळती : शिक्षकांसह विद्यार्थ्यांना नाहक त्रास

लोकमत न्यूज नेटवर्क
तळेगाव (श्या.पंत.) : आजचा विद्यार्थी उद्याच्या प्रगत भारताचा नागरिक राहणार असल्याने विद्यार्थी दशेत त्याच्यावर योग्य संस्कार होणे गरजेचे आहे. शिवाय याच उद्देशाला केंद्रस्थानी ठेऊन शासनाकडूनही विशेष पावले उचलली जात आहे. परंतु, येथील जुन्या वस्तीतील जि.प. शाळेची कवेलू फुटली असल्याने या शाळेतील विद्यार्थ्यांना पाऊस सुरू झाल्यावर छतगळतीमुळे भिजतच शिक्षणाचे धडे घ्यावे लागत आहे. विशेष म्हणजे ही समस्या वरिष्ठांना सांगिल्यावरही त्यांच्याकडून दुर्लक्ष करण्यात धन्यता मानली जात असल्याने विद्यार्थ्यांसह शिक्षकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
येथील जुन्या वस्तीमधील जि.प. प्राथमिक कन्या शाळेची इमारत फार जुनी आहे. तीन वर्षांपूर्वी या शाळेच्या छताची दुरूस्ती करण्यात आली होती. परंतु, त्यानंतर कुठलेही दुरूस्तीचे काम करण्यासाकडे दुर्लक्षच करण्यात आले. शाळेच्या छत कवेलूचे असून सध्या अनेक कवेलू फुटले आहेत. तर काही ठिकाणी लाकडी खांबच कुजल्यामुळे छतही वाकल्यागत दिसते. या शाळेच्या छताची दुरूस्ती करण्यात यावी, अशी मागणी आहे. परंतु, शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी कानाडोळा करण्यातच धन्यता मानत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्नही निर्माण झाला आहे. थोडा जरी पाऊस आला की विद्यार्थ्यांना वर्गखोलीतच भिजत शिक्षणाचे धडे घ्यावे लागत आहे. कधीही कोसळेल अशी या शाळेच्या छताची अवस्था असून सध्या जीव मुठीत घेऊनच विद्यार्थ्यांना वर्गखोलीत थांबावे लागत आहे. इतकेच नव्हे तर शाळेतील शिक्षकांना शालेय कामे पूर्ण करण्यासाठी चांगलाच त्रास सहन करावा लागत आहे. तर शाळेतील महत्त्वपूर्ण कागदपत्रे भिजण्याची भीती बळावत आहे. त्यामुळे सदर प्रकरणी तातडीने योग्य कार्यवाही करण्याची मागणी आहे.

‘त्या’ ठरावाला केराची टोपली
शाळेच्या छताची दुरूस्ती करण्याबाबतचा ठराव शाळा व्यवस्थापन समितीने घेऊन तो २०१७-१८ आला आणि यंदा २६ जुनला केंद्र प्रमुखांमार्फत गटशिक्षणाधिकारी आष्टी यांना पाठविण्यात आला आहे. मात्र, त्यावर अद्यापही कुठलीही कार्यवाही करण्यात आलेली नाही.

९३ पटसंख्या
या शाळेत १ ते ४ वर्ग आहेत. इतकेच नव्हे तर या शाळेची पटसंख्या सध्या ९३ आहे. असे असताना येथील छत दुरूस्तीकडे दुर्लक्ष करण्यात धन्यता मानली जात आहे.
छताला गळती लागल्याने याचा नाहक त्रास शाळेतील विद्यार्थ्यांसह शिक्षकांना सहन करावा लागत आहे. वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज आहे.

Web Title: Soaking in the classroom requires lessons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.