सहा लाखांचा मुद्देमाल जप्त

By Admin | Updated: July 5, 2014 01:12 IST2014-07-05T01:12:22+5:302014-07-05T01:12:22+5:30

स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या वतीने जिल्ह्यात तीन ठिकाणी कारवाई करण्यात आली.

Six lakh worth of money seized | सहा लाखांचा मुद्देमाल जप्त

सहा लाखांचा मुद्देमाल जप्त

वर्धा : स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या वतीने जिल्ह्यात तीन ठिकाणी कारवाई करण्यात आली. या कारवाईत एकूण सहा लाख एक हजार ४७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईत पाच जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले.
देवळी टोलनाक्याजवळ सापळा रचून करण्यात आलेल्या कारवाईत एमएच ३१ सीएम ६६८० क्रमांकाच्या गाडीची झडती घेतली असता गाडीत मोठ्या प्रमाणात दारूसाठा असल्याची माहिती मिळाली. या कारवाईत एकूण २ लाख ५८ हजार ७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यात सचीन उर्फ गोलू गणेशलाल साहू (३७) व दीपक दयाराम बांते (३४) दोन्ही रा. महादेवपुरा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
सालोड (हि.) मार्गावर नाकाबंदी करून केलेल्या कावाईत एमएच ३२ सी १५३ या क्रमांच्या कारची झडती घेतली असता त्यात विदेशी दारू, बियर असल्याचे आढळून आले. या कारवाईत एकूण २ लाख २६ हजार २०० रुपयांचा माल जप्त करण्यात आला. या कारवाईत अजय पुसतकर (४४) रा. साने गुरूजी नगर, आर्वी नाका याच्यावर कारवाई करण्यात आली.
पोद्दार बगिचा येथील राजेश जयस्वाल यांच्या घरी छापा घालण्यात आला. यावेळी घराची झडती घेतली असता घरातून मोठ्या प्रमाणात दारूसाठा जप्त करण्यात आला. या कारवाईत राजेश जयस्वाल पोलिसांना धक्का देवून पळ काढण्यात यशस्वी झाला तर त्याचा सहकारी अक्षय पटेल रा. बोरगांव (मेघे) याला अटक करण्यात आली. जयस्वाल याने घराच्या वरच्या मजल्यावर भिंतीच्या कप्प्यात दारूसाठा लपवून ठेवला होता. या कारवाईत एकूण १ लाख २७ हजार २०० रुपयांचा माल जप्त करण्यात आला. तिन्ही कारवाईत पोलिसांनी दारूबंदी कायद्याच्या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
ही कारवाई एसपी अनिल पारस्कर यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक एम. डी. चाटे यांच्या निर्देशाप्रमाणे सहा. फौजदार उदयसिंग बारवाल, जमादार अशोक वाट, परीमळ, आदे, अनिल भस्मे, लाखे, कडवे यांनी केली.(शहर प्रतिनिधी)

Web Title: Six lakh worth of money seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.