साहेब...! दिवाळी आली अन् गेली; आम्हा भटकंती करणाऱ्या जमातीसाठी रोजचाच शिमगा, रोजचीच दिवाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2020 05:00 AM2020-11-20T05:00:00+5:302020-11-20T05:00:13+5:30

आर्वीतील तळेगाव मार्गावर रस्त्याच्या कडेला सात कुठुंब पाल ठाकून राहत आहे. त्यांच्या परिवारात ४० सदस्य असून पोट भरण्याकरिता गावोगावी जाऊन ते आयुर्वेदिक अैाषधी विकण्याचे काम करतात. त्यांच्या परिवारात जवळपास ११ लहान मुलं असून या कोरोनायनात साऱ्यांचेच  दिवाळे निघाल्याने त्याचा परिणाम दिवाळीच्या उत्साहावर पडला. या भटक्या जमातीच्या लाेकांनीही दिवाळीचा आनंद घेता आला नाही.

Sir ...! Diwali has come and gone; Daily Shimga, daily Diwali for the nomadic tribes | साहेब...! दिवाळी आली अन् गेली; आम्हा भटकंती करणाऱ्या जमातीसाठी रोजचाच शिमगा, रोजचीच दिवाळी

साहेब...! दिवाळी आली अन् गेली; आम्हा भटकंती करणाऱ्या जमातीसाठी रोजचाच शिमगा, रोजचीच दिवाळी

googlenewsNext
ठळक मुद्देरस्त्यालगतच्या झोपडीत पेटविली पणती ; फाटक्या कापडांवरच बच्चेकंपनींचा निरागस उत्साह

 लोकमत न्यूज नेटवर्क
देऊरवाडा/ आर्वी : भारतीय संस्कृतीमध्ये दिवाळी सणाला विशेष महत्व आहे. हा सण प्रकाशपर्व म्हणून श्रीमंतापासून तर सर्व सामान्यांपर्यंत सारेच आपापल्या परीने साजरे करतात. मात्र, रस्याच्या कडेला पाल ठाकून राहणाऱ्या भटक्या जमातीतील लोकांच्या झोपडीत दिवाही पेटला नाही. एकाच पणतीच्या प्रकाशात दिवाळी साजरी करणाऱ्या या भटक्या कुटुंबानी ‘साहेब...! आमच्याकरिता रोजचाच शिमगा अन् रोजचीच दिवाळी’, अशी अगतिकता लोकमतशी बोलताना व्यक्त केली.
आर्वीतील तळेगाव मार्गावर रस्त्याच्या कडेला सात कुठुंब पाल ठाकून राहत आहे. त्यांच्या परिवारात ४० सदस्य असून पोट भरण्याकरिता गावोगावी जाऊन ते आयुर्वेदिक अैाषधी विकण्याचे काम करतात. त्यांच्या परिवारात जवळपास ११ लहान मुलं असून या कोरोनायनात साऱ्यांचेच  दिवाळे निघाल्याने त्याचा परिणाम दिवाळीच्या उत्साहावर पडला. या भटक्या जमातीच्या लाेकांनीही दिवाळीचा आनंद घेता आला नाही.

दिवाळी काय खरेदी केले?
दिवाळी कधी आली अन् कधी गेली आम्हाला कळलेही नाही. त्या दिवशी आमच्या पालात पणती लावली आणि देवीची पूजा केली. पण, आम्हा लाेकांवर देवी कधी प्रसन्न होईल हे देव जाणे. येथे खायचेचे वांधे झाले आहे तेथे दिवाळीची खरेदी कुठून करणार, अशी व्यथा मांडली.

मुलांनी कसा लुटला आनंद
इतरत्र फुटणारे फटाके आणि मोठ- मोठ्या घरांवर केलेली रोषणाई बघितली. जुन्याच कपड्यावर राहून घरात बणविलेले अन्न घाऊन दिवाळीचा सण साजरा केला. दिवाळीकरिता कुठे हात पसरला पण, देणाऱ्यांचे हातही कमी पडलेत.

कोरोनामुळे काही कायम परिणाम झाला 
लॅाकडाऊनमुळे आठ महिन्यांपासून हाताला काम नाही. दारोदारी भटकून उदरनिर्वाह करणाऱ्यांची परिस्थिती तर फारच विदारक आहे. कुणी उधारीवर पैसे द्यायला तयार नव्हते तर कुणी खायला देण्यास तयार होत नव्हते. गावाबाहेर जाणेही शक्य नसल्याने मिळतच पूर्णत: बंद झाली, असे विरु वैद्य धुर्वे यांनी सांगितले.
झोपडीतील मुलांना काय वाटते...
दिवाळीच्या दिवशी दररोज सारखचं खेळलो. सायंकाळी समोरच्या घरांवर दिसणारी रोषणाई आणि आकाशात उडणारे फटाके बघत होतो. आईने पालात जे काही शिजविले ते खाल्लं आणि झोपी गेलो. गोडधोडचा तर पत्ताच नाही. दिवाळीत नवीन कपडे आम्हाला कधीही नशिबी आले नाही, असे पालावरील खनको धुर्वे याने सांगितले.

 

Web Title: Sir ...! Diwali has come and gone; Daily Shimga, daily Diwali for the nomadic tribes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Diwaliदिवाळी