पक्षकाराच्या पैशाची अन् वेळेची बचत होईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2019 12:22 AM2019-03-23T00:22:42+5:302019-03-23T00:23:12+5:30

राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये आपसी तडजोडीने प्रकरणे निकाली काढल्यास पक्षकारांचा वेळ व पैशाची बचत होते. शिवाय, प्रकरणे आपसी समझोत्याने लवकर निकाली निघाल्यामुळे दोन्ही पक्षकरांना मानसिक समाधान मिळते, असे प्रतिपादन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश विजयकुमार पाटकर यांनी केले.

Saving money and time will be saved | पक्षकाराच्या पैशाची अन् वेळेची बचत होईल

पक्षकाराच्या पैशाची अन् वेळेची बचत होईल

Next
ठळक मुद्देविजयकुमार पाटकर : २९८ प्रकरणे आपसी तडजोडीने निकाली

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये आपसी तडजोडीने प्रकरणे निकाली काढल्यास पक्षकारांचा वेळ व पैशाची बचत होते. शिवाय, प्रकरणे आपसी समझोत्याने लवकर निकाली निघाल्यामुळे दोन्ही पक्षकरांना मानसिक समाधान मिळते, असे प्रतिपादन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश विजयकुमार पाटकर यांनी केले.
राष्ट्रीय लोक अदालतीच्या उद्घाटनपर कार्यक्रमात ते मार्गदर्शन करताना बोलत होते. व्यासपीठावर दिवाणी वरिष्ठ न्यायाधीश, दिवाणी न्यायाधीश, जिल्हा शासकीय अभियोक्ता, वकील संघाचे अध्यक्ष सदस्य आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सदस्य सचिव निशांत परमा यांची उपस्थिती होती.
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश पाटकर पुढे म्हणाले, आपसी समझोत्यामुळे तडा गेलेल्या मनांना व दुरावलेल्या संबंधांना जोडण्याचा प्रयत्न या लोक अदालतीच्या माध्यमातून केला जातो. त्यामुळे दोन्ही कुटुंबांमध्ये पारिवारिक व सामाजिक स्नेह वाढतो, असे सांगितले.
जिल्ह्यातील न्यायालयांमध्ये संपन्न झालेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये प्रलंबित प्रकरणांपैकी १७२ प्रकरणे आपसी तडजोडीद्वारे निकाली काढण्यात आली. सदर तडजोड झालेल्या प्रकरणामधील तडजोडीच्या रकमेचे मूल्य १ कोटी ९२ लाख ७६ हजार १८६ रुपये होते. त्याप्रमाणे वाद दाखलपूर्व प्रकरणांपैकी १२६ प्रकरणे आपसी तडजोडीतून निकाली काढण्यात आली. या प्रकरणांमधील तडजोडीचे मूल्य ३१ लाख ५ हजार ९३७ रुपये होते.
जिल्ह्यातील एकूण २९८ प्रकरणे आपसी तडजोडीने निकाली काढण्यात आले असून तडजोडीचे एकूण मूल्य २ कोटी २३ लाख ८२ हजार १२३ रुपये आहे.

लोक अदालतीमध्ये सामोपचाराने वाद मिटवावे - निशांत परमा
दोन्ही पक्षकारांच्या आपसी सहमतीने प्रकरणामध्ये समझोता होत असल्यामुळे अदालतीमध्ये निघणाऱ्या प्रकरणांमुळे पक्षकारांना समाधान लाभते. वादापेक्षा समझोता बरा या विचारानुसार पक्षकारांनी आपसातील वाद सामोपचाराने लोक अदालतीमध्ये मिटवावे, असे आवाहन याप्रसंगी निशांत परमा यांनी केले.

Web Title: Saving money and time will be saved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.