गांधीजयंती सप्ताहाच्या समारोपाला निघणार १५१ सायकलस्वारांची यात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2020 04:53 PM2020-10-09T16:53:32+5:302020-10-09T16:55:44+5:30

Mahatma Gandhi Wardha News महात्मा गांधी यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त सुरू असलेल्या सप्ताहाचा समारोप १० ऑक्टोबरला सकाळी ९ वाजता सेवाग्राम आश्रम येथे १५१ सायकलस्वारांच्या सायकलयात्रेने होणार आहे.

A procession of 151 cyclists will leave at the end of Gandhi Jayanti week | गांधीजयंती सप्ताहाच्या समारोपाला निघणार १५१ सायकलस्वारांची यात्रा

गांधीजयंती सप्ताहाच्या समारोपाला निघणार १५१ सायकलस्वारांची यात्रा

Next
ठळक मुद्दे‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ अभियानगावोगावी करणार जनजागृती

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : महात्मा गांधी यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त सुरू असलेल्या सप्ताहाचा समारोप १० ऑक्टोबरला सकाळी ९ वाजता सेवाग्राम आश्रम येथे १५१ सायकलस्वारांच्या सायकलयात्रेने होणार आहे. या यात्रेत जिल्हाभर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘आपले कुटुंब, आपली जबाबदारी’ मोहिमेविषयी जनजागृती आरोग्य तपासणी व आरोग्य संदेशाद्वारे करण्यात येणार आहे. याकरिता जिल्हा प्रशासनाकडून तयारी केली जात आहे.

जिल्ह्यातील १० नगर परिषद व नगरपंचायत क्षेत्रात १५१ सायकलस्वारांची सायकल रॅली तसेच चित्ररथाद्वारे शहराच्या प्रमुख मार्गाने मार्गक्रमण करून ‘आपले कुटुंब, आपली जबाबदारी’ या मोहिमेची जनजागृती करणार आहे. यादरम्यान रॅलीमध्ये लोकप्रतिनिधी, आशा, अंगणवाडी सेविका, आरोग्य विभागाचे कर्मचारी, ग्रामविकास विभागाचे कर्मचारी, महसूल विभागाचे कर्मचारी सहभागी होऊन नागरिकांना प्रत्यक्ष कोरोना विषाणू आजाराबाबत घ्यावयाची काळजी याबाबत माहिती देतील. तसेच चित्ररथाद्वारे ऑडिओ संदेशाच्या स्वरूपात मार्गदर्शनासोबत वैद्यकीय अधिकारी नागरिकांची तपासणी करणार आहेत. आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे पालन व्हावे यासाठी रॅलीमध्ये उपस्थितांचा विचार करून शहराच्या लोकसंख्येच्या दृष्टीने वर्धा शहरासाठी चार पथके तयार करण्यात आली असून पथक क्रमांक एक सेवाग्राम आश्रम येथून निघणार आहे. रॅलीचा प्रारंभ मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. दुसऱ्या व तिसºया पथकातील रॅलीचा प्रारंभ बजाज चौक व चौथ्या पथकातील रॅलीचा प्रारंभ महात्मा गांधी चौक येथून करण्यात येणार आहे. रॅली विविध मार्गाने क्रमण करुन ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ तसेच महात्मा गांधींचा संदेश आणि महात्मा गांधींच्या विचारांबाबत जनजागृती करणार आहे.

गांधीजयंती सप्ताहाच्या समारोप कार्यक्रमात लोकप्रतिनिधींचाही सहभाग राहणार आहे. रॅलीदरम्यान वैद्यकीय पथक नागरिकांना सर्दी, ताप, खोकला, अस्थमा, मधुमेह, किडनी यासारखे आजार असल्याची तपासणी करून पुढील उपचाराबाबत मार्गदर्शन करतील. सायकल रॅलीमध्ये सहभागी व्यक्ती ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ असलेले टी-शर्ट व टोपी परिधान करून नगरपालिका, नगर पंचायत व शहरालगत असलेल्या ग्रामपंचायत परिसरात जनजागृती करणार आहे. तपासणीमध्ये नागरिकांनी सहकार्य करावे.
- विवेक भीमनवार, जिल्हाधिकारी, वर्धा.

Web Title: A procession of 151 cyclists will leave at the end of Gandhi Jayanti week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.