नैतिक शिक्षणाकरिता गांधी विचारांची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2019 09:57 PM2019-08-21T21:57:16+5:302019-08-21T21:57:57+5:30

आजच्या काळात नैतिक शिक्षणाचे पतन होत आहे. अशा परिस्थितीत महात्मा गांधी यांचा नैतिक शिक्षणाचा विचार आज अत्यंत प्रासंगिक आहे. गांधीजींनी सर्वधर्म समानतेचा विचार मांडला होता. तो अमलात आणण्याकरिता कार्य करण्याची गरज आहे, असे मत केरळच्या साहित्यिक प्रो. के. एम. मालती यांनी व्यक्त केले.

Need for Gandhian Thought for Moral Education | नैतिक शिक्षणाकरिता गांधी विचारांची गरज

नैतिक शिक्षणाकरिता गांधी विचारांची गरज

Next
ठळक मुद्देके. एम. मालती : सेवाग्राममध्ये ‘गांधी विचाराची प्रासंगिकता’ विषयावर चिंतन

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : आजच्या काळात नैतिक शिक्षणाचे पतन होत आहे. अशा परिस्थितीत महात्मा गांधी यांचा नैतिक शिक्षणाचा विचार आज अत्यंत प्रासंगिक आहे. गांधीजींनी सर्वधर्म समानतेचा विचार मांडला होता. तो अमलात आणण्याकरिता कार्य करण्याची गरज आहे, असे मत केरळच्या साहित्यिक प्रो. के. एम. मालती यांनी व्यक्त केले.
त्या महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय आणि भारतीय इतिहास अनुसंधान परिषद, नवी दिल्ली यांचा विद्यमाने महात्मा गांधींंच्या १५० व्या जयंतीनिमित्त ‘गांधी आणि त्यांची समसामयिक प्रासंगिकता : समाज, संस्कृती आणि स्वराज’ या विषयावर आयोजित राष्ट्रीय परिसंवादाच्या चवथ्या सत्राच्या अध्यक्षा म्हणून बोलत होत्या.
सेवाग्राम आश्रमातील गांधी भवनात २०, २१ आणि २२ आॅगस्टला या राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. या चवथ्या सत्रात दिल्ली विश्वविद्यालयाचे माजी कुलगुरु प्रख्यात गणितज्ज्ञ पद्मश्री दिनेश सिंह, मुंबईच्या सेंट जेवियर महाविद्यालयाचे गांधी तत्वज्ञानाचे अध्यापक डॉ. अवकाश जाधव, बनारस हिंदू विश्वविद्यालय वाराणसीचे गांधी विचार विभागाचे संस्थापक अध्यक्ष प्रो. राम प्रकाश द्विवेदी यांनी विचार मांडले. पद्मश्री दिनेश सिंह यांनी ‘आधुनिक युगात गांधींचे महात्म्य’ या विषयावर विचार मांडले. डॉ. अवकाश जाधव यांनी ‘शरीराच्या माध्यमातून संदेश’ हा विषय मांडताना गांधीजींची देहबोली आणि त्यांचा सामाजिक संदेश या विषयावर भाष्य केले. प्रो. राम प्रकाश द्विवेदी यांनी ‘समन्वित विकास आणि महात्मा गाधी’ या विषयावर विचार मांडले. या सत्राचे संचालन डॉ.मनोज कुमार राय यांनी केले.
आज होणार समारोप
राष्ट्रीय परिसंवादाचा समारोप गुरुवारी दुपारी २ वाजता प्रो. कुमार रत्नम यांच्या अध्यक्षतेखाली होईल. यावेळी प्रो. अशोक मोडक, राघवशरण शर्मा, प्रो. वी. के.वशिष्ठ, आर. सी. प्रधान, प्रो. पुष्पा मोतियानी, प्रो. के. एम. मालती, डॉ. सुरेशकुमार, देवजानी चक्रबोर्ती, डॉ. नवी खानगी, प्रो. जी. गोपीनाथन, डॉ. शैलेश कुमार मिश्र, प्रो. मेधा तापियालवाला, डॉ. ऐंजला गंगमई, डॉ. रवि शेखर सिंह, डॉ. राणा सांनिया हे विचार मांडतील.

Web Title: Need for Gandhian Thought for Moral Education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.