जिल्ह्यात ‘मोस्ट वॉन्टेड’ @१२४

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2020 05:00 AM2020-08-13T05:00:00+5:302020-08-13T05:00:27+5:30

जानेवारी २०२० ते ऑगस्ट या आठ महिन्यात आजपर्यंत विविध गुन्हे करून पसार झालेल्या जिल्ह्यातील १९ पोलीस ठाण्यांतील तब्बल १२४ आरोपी फरार असल्याची नोंद वर्धा पोलीस या सोशल साईटवर करण्यात आली आहे. या मोस्ट वॉन्टेड आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी विविध उपाय योजले आहे. गुन्ह्याची नोंद एकदा पोलीस दप्तरी झाली तर पोलिसांच्या तावडीतुन कुणीही सुटत नाही.

Most Wanted in the District @ 124 | जिल्ह्यात ‘मोस्ट वॉन्टेड’ @१२४

जिल्ह्यात ‘मोस्ट वॉन्टेड’ @१२४

Next
ठळक मुद्देसोशल साईटवरील रेकॉर्ड : १९ ठाण्याच्या हद्दीत विविध गुन्हे प्रकरण

चैतन्य जोशी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : गुन्हेगारीच्या विविध क्षेत्रात गंभीर गुन्हे दाखल असणारे १२४ आरोपी अद्यापही जिल्ह्यतील १९ पोलीस ठाण्यांना हवे आहेत. पोलीस या आरोपींच्या मागावर असले तरी या आरोपींचा शोध घेणे पोलिसांपुढे आव्हान ठरत आहे. वर्धा पोलीसांच्या सोशल मीडिया साईटवर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांतील १२४ आरोपी वॉन्टेड असल्याचे दिसून आले आहे.
जानेवारी २०२० ते ऑगस्ट या आठ महिन्यात आजपर्यंत विविध गुन्हे करून पसार झालेल्या जिल्ह्यातील १९ पोलीस ठाण्यांतील तब्बल १२४ आरोपी फरार असल्याची नोंद वर्धा पोलीस या सोशल साईटवर करण्यात आली आहे. या मोस्ट वॉन्टेड आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी विविध उपाय योजले आहे. गुन्ह्याची नोंद एकदा पोलीस दप्तरी झाली तर पोलिसांच्या तावडीतुन कुणीही सुटत नाही. आरोपी कितीही तरबेज असला तरी त्याचा शोध लागतोच. जिल्हा पोलीस प्रशासनाने फरार आरोपी व वॉन्टेड गुन्हेगारांचा छडा लावण्याचे निश्चित केले आहे. प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फरार आरोपींची यादी तयार करण्यात आली आहे. खून प्रकरणात जिल्ह्यातील वडनेर ठाण्यातील १, वर्धा ६, सेलू १, कारंजा १, सिंदी (रेल्वे) १, पुलगाव २ आष्टी १, समुद्रपूर १ असे १४ गुन्हेगार वॉन्टेड आहेत. चोरी प्रकरणात सेलू २, सिंदी १, वर्धा ३, आर्वी २, खरांगणा १, वडनेर १ अशा दहा आरोपींच्या मागावर पोलीस आहेत. खूनाच्या प्रयत्नात सेवाग्राम आणि सिंदी (रेल्वे) ठाण्यातील प्रत्येकी १ आरोपी वॉन्टेड आहे. तर सदोष मनुष्य वधाच्या गुन्ह्यात सेलू ठाण्यातील १ आरोपी फरार आहे. अत्याचार प्रकरणात वर्धा पोलीस ठाण्यातील २ आणि सेलू ठाण्यातील १ अशा तीन आरोपींच्या मागावर पोलीस आहे. घरफोडीच्या गुन्ह्यातील आर्वी ठाण्यांतर्गत ११, हिंगणघाट १, सिंदी ५, देवळी ३, वर्धा २, कारंजा २, गिरड २, वडनेर, २, पुलगाव १, सेवाग्राम २, खरांगणा १, समुद्रपूर १, तळेगाव १ असे एकूण ३४ आरोपी वॉन्टेड आहेत. पळवून नेण्याच्या घटनेत कारंजा ठाण्यातील १ आरोपीचा शोध सुरु आहे. मारहाण प्रकरणात सिंदी १, वर्धा ४, देवळी ४, हिंगणघाट १, आर्वी ४ असे १० आरोपींचा शोध सुरु आहे. शासकीय कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्याप्रकरणात आष्टी येथील १, सिंदी (रेल्वे) ठाण्यातील १ आरोपी फरार आहे. विनयभंग प्रकरणात कारंजा ठाण्यातील १ आरोपी, छळ केल्याप्रकरणात पुलगाव येथील १ तर आर्वी ठाण्यातील १ आरोपी तसेच आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणात आवीं पोलीस ठाण्यातील २ आरोपींना अद्यापही पकडण्यात पोलिसांना यश आलेले नाही.
तसेच इतर गुन्ह्यात आर्वी येथील ६, हिंगणघाट १ वर्धा ३ तर कारंजा ठाण्यातील १ अशा एकूण ११ वॉन्टेड आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. फरार आरोपी आणि वॉन्टेड गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी आता पोलीस प्रशासन खबऱ्यांची मदत घेत आहेत. जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांतर्गत गंभीर गुन्ह्यातील आरोपींना शोधण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे.

फसवणूकप्रकरणात २७ आरोपी वॉन्टेड
नागरिकांना आॅनलाईन गंडविण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात सुरु आहे. फसवणूक करणारे भामटे बाहेर राज्यातील असल्याने पोलिसांना पकडणे शक्य होत नाही. जानेवारी ते ऑगस्ट या कालावधीत वर्धा ठाण्यांतर्गत ११ आरोपी, कारंजा १, खरांगणा २, देवळी १, वडनेर १, आर्वी ४, सिंदी ३, सेलू १, हिंगणघाट १, सेवाग्राम ठाण्यांतर्गत २ असे एकूण २७ भामटे अजूनही पोलिसांना गवसले नसून पोलिसांकडून शोध सुरु आहे.
मागील एक वर्षांपासून फरार असलेल्या तसेच मोस्ट वॉन्टेड असलेल्या पाच आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. हे आरोपी पोलिसांना गुंगारा देत होते. अखेर पोलिसांनी त्यांना बेड्या ठोकल्याचे स्थानिक गुन्हे शाखेकडून सांगण्यात आले.

३० गुन्हेगार हद्दपार
जानेवारी ते आजपर्यंत महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये सिंदी (रेल्वे) ठाण्यांतर्गत ६ आरोपींना एक वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. तसेच वर्धा ठाण्यांतर्गत ७ आरोपींना ४ महिन्यांसाठी तर ४ आरोपींना एक वर्षासाठी हद्दपार केले आहे. रामनगर ठाण्यातील ३, देवळी ठाण्यातील ३, पुलगाव ठाण्यातील ३, सावंगी ठाण्यांतर्गत ४ अशा एकूण ३० गुन्हेगारांना जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.

गंभीर गुन्ह्यातील नऊ आरोपी फरार
विविध गंभीर गुन्ह्यातील फरारी आरोपींना पकडण्यासाठी न्यायदंडाधिकाऱ्यांनी काढलेल्या जाहीरनाम्यामध्ये ९ आरोपी फरारी आहेत. यामध्ये खून प्रकरणात हिंगणघाट पोलीस ठाण्यांतर्गत तीन, दरोडा प्रकरणात वर्धा ठाण्यांतर्गत १, घरफोडी प्रकरणात तळेगाव ठाण्यांतर्गत १ चोरी प्रकरणात देवळी ठाण्यांतर्गत १ तर इतर गुन्ह्यांमध्ये वर्धा ठाण्यांतर्गत ३ फरारी आरोपींना पकडून आणण्यासाठी न्यायदंडाधिकाºयांनी जाहीरनामा काढला आहे.

Web Title: Most Wanted in the District @ 124

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.